आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Eye Safety in Kitchen

मागच्या २ लेखांमध्ये आपण वैमानिक आणि सैन्य/नौदल यांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची दृष्टी कशी असावी आणि मुख्यतः वैमानिकांना डोळ्यांच्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याबद्दल चर्चा केली. या लेखामध्ये आपण जर तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये शेफ होऊ इच्छिता त्यांना काय डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत. जसं वैमानिक किंवा सैन्य/नौदलात प्रवेश घेताना जितकी डोळ्यांची काटेकोर तपासणी केली जाते आणि फार कडक निकष लावले जातात तसे निकष जरी नसले तरी दृष्टीतल्या काही अडचणी या तुम्हाला काम करताना अडथळा निर्माण करू शकतात, त्याबद्दल आधी समजून घेऊया.


१) जर तुम्हाला चष्मा असेल तर किचनमध्ये काम करताना तिथल्या उष्णतेमुळे चष्म्यावर सारखा धूर साठणे किंवा धुरकट दिसणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अर्थात चष्मा असेल तर तुम्ही किचनमध्ये काम करूच शकत नाही असं अजिबात नाही.

२) जर तुम्ही चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर किचनमधल्या अतिउष्ण वातावरणामुळे आधीच डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते, ती कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या दीर्घ वापराने अधिक होऊ शकते.

३) तुम्हाला रंगांधळेपणा असेल तर मात्र किचनमध्ये काम करणं तुम्हाला जवळपास अशक्य आहे कारण तुम्हाला पदार्थांचे विविध रंग त्यांच्या छटा समजल्याच नाहीत तर तुम्ही किचनमध्ये काम करूच शकणार नाही.

आता बघूया रेस्टोरंन्टस्च्या किचनमध्ये काम करताना डोळ्यांच्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्यावरचे उपाय केले पाहिजेत.

१) डोळे कोरडे पडणे :- किचमधली उष्णता आणि कोंदटपणा याने डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. त्यात पुन्हा स्टोव्ह, फ्रायर किंवा मोठ्या ओव्हनच्या सानिध्यात काम करणाऱ्यांना तर या समस्येचा सामना १००% करावा लागतो. डोळे कोरडे पडण्यावर एक उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांचा ओलावा राखणारी औषधं अगदी नियमितपणे डोळ्यात घालत राहणे. किचनमध्ये पुरेसा प्रकाश आहे ना याची चाचपणी करणे आणि नसल्यास त्याची व्यवस्था करून घेणे. दर थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेऊन डोळे मिटून बसणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी पिणे.

२) डोळ्यात फोडणी, किंवा इतर गोष्टींची वाफ जाऊन डोळ्याला इजा होणे :- किचनमध्ये शिजणारे पदार्थ असोत, तिथली भांडी ज्यांनी स्वच्छ केली जातात ती केमिकल्स असोत की तिथे निर्माण होणारा धूर असू दे याने डोळ्यांना इजा होऊ शकते. यावर एक उपाय म्हणजे डोळ्यावर शक्यतो एखादा आवरणात्मक चष्मा घालावा, आणि अर्थात किचनमधले एक्झॉस्ट पंखे नीट चालू आहेत ना हे पहावं. पण समजा तरीपण डोळ्यांना काही इजा झालीच तर डोळे थंड पाण्याने धुवावेत पण ते चोळू नयेत. आणि डोळे मिटून काही काळ शांत बसावं. आणि तरीही डोळ्यांची लाली किंवा जळजळ कमी झाली नाही तर मात्र त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे धाव घ्यावी.

३) गरम तेल किंवा एखादी वस्तू उडणे :- कधीकधी किचनमध्ये काम करताना जर तुमचा चेहरा त्या भांड्याच्या जवळ असेल तर मात्र फोडणीचे काही थेंब डोळ्यात जाऊन डोळ्यांना इजा करू शकतात. मुख्यतः गरम तेलाचे थेंब उडून डोळ्यात जाऊ शकतात. अशी घटना घडली तर मात्र कोणतेही घरगुती उपाय न करता, प्रथम डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवून तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरला दाखवावेत.

४) तुम्हाला काही पदार्थांची ऍलर्जी आहे का याची तपासणी जरूर करा. काही वेळेस एखाद्या पदार्थाची ऍलर्जी येऊन डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे हे घडू शकतं. अशी काही ऍलर्जी असल्यास मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-ऍलर्जी आयड्रॉप्स न चुकता घालावेत.

जर या सगळ्याची काळजी तुम्ही नीट घेतलीत, पोटातून माणसांची मनं जिंकणाऱ्या व्यवसायात तुम्ही दीर्घकाळ आणि यशस्वी कामगिरी करू शकाल.

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Her taking the initiative like that is what made me love lauren as our photographer. dental implants cost.