
उतारवयात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी – डोळा हा शरीराचा महत्वपूर्ण व संवेदनशील अवयव असून त्याची योग्य रितीने काळजी घेणे गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टीसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात, मात्र पौष्टिक आहार व योग्य जीवनशैली राखल्यास डोळ्यांच्या समस्या रोखता येतात.
वृद्ध व्यक्ती आणि मधुमेहग्रस्तांनी सामान्यपणे दरवर्षी एकदा तरी डोळ तपासून घेतले पाहिजेत. सुरूवातीच्या काळात डोळ्यांच्या समस्येची लक्षणे दिसल्यास त्यावर योग्य उपचार करता येणे शक्य होते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्यांची व्यवस्थित निगा राखलीच पाहिजे.
मुळात वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या काय काय समस्या उद्भवू शकतात हे समजवून घेतलं पाहिजे. वाढत्या वयात डोळ्यात अगदी सर्रास आढळणारा आजार म्हणजे डोळ्यांची दृष्टी किंचित अंधुक झाली आहे. वाढत्या वयात मोतीबिंदू किंवा काचबिंदू ही त्याची महत्वाची कारणं असू शकतात. त्यामुळे वयाच्या चाळिशीनंतर डोळ्यांची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे.
डोळ्यांच्या आरोग्याला पूरक असा पौष्टिक आहार हा घेतलाच पाहिजे. ए व्हिटॅमिन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी १२ सारखी व्हिटॅमिन्स पोटात योग्य प्रमाणात जातील हे पाहिलं पाहिजे.
मुळात प्रखर सूर्यप्रकाशाचा त्रास हा सगळ्याच वयोगटातील लोकांना होतो पण तो जरा जास्त वय वाढलं की होऊ लागतं त्यामुळे दिवसा घराबाहेर बाहेर पडताना गॉगल घालून बाहेर पडलं पाहिजे.
फोन आणि कॉम्प्युटरच्या अति वापरामुळे आपले डोळे ब्ल्यू लाईटच्या संपर्कात येतात, ज्यामुळे डोळे कोरडे पडणे, थकवा येणे यापासून ते मायोपिया व एएमडी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे स्क्रीन टाईम कमी करावा. खरंतर सर्वच वयातील लोकांनी फोन आणि कम्युटरचा अतिवापर टाळावा.
डायबेटीस असलेल्यांनी तर डोळ्यांची अधिकच काळजी घ्यावी. डॉक्टरांकडून अगदी नियमित तपासणी करून घ्यावी.
डोळ्यांचे व्यायाम माफक प्रमाणात पण केलेच पाहिजेत
जसं वय वाढत जातं तसं डोळे कोरडे पडण्याची समस्या अधिक वाढत जाते त्यामुळे डोळे थंड पाण्याने पण हलक्या हाताने धुणे, डोळ्यावर थंड दुधाच्या घड्या ठेवणे किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने एखादं ल्युब्रिकंट औषध डोळ्यात घालणे हे केलं पाहिजे.
वर सांगितलेले सर्व उपाय केले तर उतारवयात होणारे डोळ्यांचे आजार वेळीच रोखता येतील
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6