ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय - ऑक्युलर मायग्रेन हा काही लोकांच्यात आढळणारा एक आजार आहे. ह्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ह्यामध्ये चेहऱ्याच्या एका भागात आणि त्या बाजूचा  डोळा दुखत राहतो आणि खाली सांगितल्यापैकी काही लक्षणं जाणवतात १) डोळ्यासमोर काहीतरी चमकतं किंवा प्रकाश येतो असं वाटत राहतं२) डोळ्यासमोर झिगझॅग पॅटर्न्स येणे३) डोळ्यासमोर तारे चमकले असं …

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय
#image_title

ऑक्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय – ऑक्युलर मायग्रेन हा काही लोकांच्यात आढळणारा एक आजार आहे. ह्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. ह्यामध्ये चेहऱ्याच्या एका भागात आणि त्या बाजूचा  डोळा दुखत राहतो आणि खाली सांगितल्यापैकी काही लक्षणं जाणवतात


१) डोळ्यासमोर काहीतरी चमकतं किंवा प्रकाश येतो असं वाटत राहतं
२) डोळ्यासमोर झिगझॅग पॅटर्न्स येणे
३) डोळ्यासमोर तारे चमकले असं वाटणं


ह्या आजाराला अर्धशिशी असं म्हणतात. ह्यात डोक्याच्या आणि चेहेऱ्याच्या भागात असह्य दुखायला लागतं, आणि हे दुखणं प्रत्येक व्यक्तीला होणाऱ्या तीव्रतेनुसार कमी जास्त असतं. कधीकधी हे दुखणं २,३ तास टिकत तर कधी २,३ दिवस पण टिकतं. ह्या आजाराचा त्रास सुरु होण्यापूर्वी खालीलपैकी काही लक्षणं अनेकांना जाणवतात. अचानक मूड बदलतो, खूप उत्साह वाटू लागतो किंवा एकदम नैराश्य आल्यासारखे वाटते. काहीतरी वेगळे खावे असे तीव्रतेने वाटते, मलावरोध होतो, मान दुखते, खूप तहान लागते, सतत जांभया येऊ लागतात. ह्यात काही लोकांना वर म्हणल्याप्रमाणे डोळ्यासमोर काहीतरी चमकणं, प्रकाश येत राहणं, झिगझॅग पॅटर्न्स येणं, तारे चमकणे अशा गोष्टी घडतात ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ऑरा’ म्हणतात. ह्या आजरातील बरीचशी लक्षणं ही डोळ्याशी निगडित असल्यामुळे सर्वसाधारणपणे डॉक्टर्स हे डोळ्यांच्या डॉक्टर्सकडे रुग्णांना पाठवतात. पण ह्या आजाराचा डोळ्याशी फारसा संबंध नसतो. ह्यात प्रत्येक रुग्णांसाठी वेगवेगळी कारणं असतात.
उदाहरणार्थ


१) काहींना चॉकोलेट वाईन इत्यादींची ऍलर्जी असते
२) खूप काळ उन्हात फिरल्यामुळे
३) काही वेळा काही विशिष्ट पदार्थांची ऍलर्जी असणे आणि नेमके तेच पदार्थ खाण्यात येणं

ह्याला मायग्रेन ऑरा असं म्हणतात आणि हा फार गंभीर स्वरूपाचा आजार नाही. हा त्रास नक्की कशाने सुरु होतो ह्याचा शोध घेऊन ते पदार्थ टाळणे किंवा जर कडक उन्हात फिरल्याने होत असेल तर ते टाळणे ह्यासारख्या साध्या उपायांनी देखील हा त्रास टाळणं शक्य आहे.
पण ह्यात एक अजून प्रकार आहे ज्याला रेटिनल मायग्रेन असं म्हणतात. हा आजार खूप दुर्मिळ आहे पण वाचकांना खाली सांगितलेली लक्षणं आढळल्यास मात्र डोळ्यांच्या डॉक्टरांची जरूर भेट घ्या


१) डोळ्याच्या एका बाजूलाच विचित्र लक्षणं जाणवणे
२) वर जे जे डोळ्यांचे त्रास सांगितले ते ५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणे
३) डोळ्याला अचानक कमी दिसायला लागणं


डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Book a Consultation

It’s easy and free!
admin

admin

Marketing your remapping services locally. 12 customer success stories : families welcoming henry’s doberman puppies.