
गरोदरपणात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी – गर्भारपण हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. या काळात तिच्या शरीरात एक नवा जीव आकार घेत असतो, पण त्याच वेळेस गर्भार स्त्रीच्या शरीरात अनेक बदल देखील होत असतात. हे फक्त शरीराच्या पातळीवरचे बदल नसतात तर ते भावनिक आणि मानसिक पातळ्यांवरचे देखील बदल असतात. या बदलांना हार्मोन्समध्ये होणारे बदल कारणीभूत असतात. आणि याचा परिणाम हा जसा शरीराच्या विविध भागांवर होतो तसा तो डोळ्यांवर देखील होऊ शकतो. त्यामुळेच आजच्या लेखात गर्भार स्त्री आणि डोळ्यांची निगा याविषयी जाणून घेऊया.
गर्भारपणाच्या काळात हार्मोन्सच्या बदलांमुळे अनेक स्त्रियांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु होऊ शकतो. चक्कर येणं, डोकं दुखणं, धाप लागणं अशी लक्षणं आढळून आली तरी त्याकडे ‘हे असं होणारच म्हणून दुर्लक्ष केलं जाऊ शकतं’. ही लक्षणं जशी आढळतात मग त्या मागोमाग डोळ्यांना किंचित धूसर दिसण्याचा त्रास पण जाणवू शकतो. अशावेळेस या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण जरी तात्पुरता का होईना पण हा उच्च रक्तदाबाचा त्रास असू शकतो आणि उच्चरक्तदाब डोळ्यांना घातक ठरू शकतो.
गरोदरपणात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
१) कमी दिसणे
२) काळी काळापुरती का होईना पण डोळ्यासमोर अंधारी येणे
३) डोळ्यांना प्रकाशाचा त्रास जाणवणे
या पैकी कोणीतीही लक्षणे आढळली तरी तुमच्या फिजिशियनला आणि डोळ्यांच्या डॉक्टरची जरूर भेट घ्या. असं अनेकदा आढळून आलं आहे की गर्भारपणाच्या आधी काही स्त्रियांना काचबिंदूचा न जाणवणारा त्रास सुरु झालेला असतो. पण या काळात त्याची लक्षणं अधिक तीव्र होतात, अशावेळेस डोळ्यांची काळजी अधिक घेणं आवश्यक आहे, त्यासाठी गरोदरपणात दर महिन्याला देखील डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासून घ्या.
हल्ली गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात तात्पुरता किंवा कधीकधी कायमचा मधुमेह बळावतो. अशावेळेस मधुमेहाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अतिशय चुकीचं आणि धोक्याचं आहे. यामुळे डोळ्यात डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता मोठी असते.
गरोदरपणात शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे कधीकधी डोळ्यांचा नंबर देखील बदलतो. पण बाळाच्या जन्मानंतर तो अनेकदा पूर्ववत देखील होतो. अशावेळेस शक्यतो लगेच चष्मा बदलू नका. किंवा अगदी चष्म्याचा नंबर बदलवाच लागला तर बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी पुन्हा चष्म्याचा नंबर तपासून घ्या.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे गर्भारपणाच्या काळात डोळ्यांची कुठलीही औषधं स्वतःच्या मनाने घेऊ नका. डॉक्टरना दाखवून, त्यांच्या सल्ल्यानेच औषधें घ्या.
गर्भारपणाच्या काळात डोळ्यात होणारे बदल किंवा त्रास हे बहुसंख्य वेळेस हे तात्पुरते असतात आणि पुढे बाळाच्या जन्मानंतर ते पूर्ववत होतात असा अनुभव आहे. पण तरीही गर्भार स्त्रीने डोळ्यांची काळजी जरूर घ्यावी.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6