
ट्रॅकोमा एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन – आज आपण ट्रॅकोमा (Trachoma ) ह्या डोळ्यांच्या आजराविषयी बोलणार आहोत. हे एक प्रकारचं बॅक्टरीयल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन bacteria Chlamydia trachomatis ह्या नावाने ओळखलं जातं. हा संसर्गजन्य आजार आहे आणि ज्यांना ह्या आजराचं इन्फेक्शन झालं आहे अशा माणसांच्या संपर्कात येण्याने किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तू उदाहरणार्थ रुमाल इत्यादी वापरल्यामुळे त्याचा संसर्ग होऊ शकतो.
ट्रॅकोमाच्या सुरुवातीच्या काळात डोळ्यांची हलकी जळजळ किंवा पापण्यांना हलकी खाज येणे अशी लक्षणं आढळतात. साधारणपणे हा संसर्ग किंवा आजार एकाच डोळ्याला न होता तो दोन्ही डोळ्यांना होतो. त्यामुळे मागील अनेक लेखांमध्ये मी म्हणलं तसं डोळ्याला कोणताही संसर्ग झाला आहे किंवा डोळ्यांना सारखी खाज येत असेल किंवा जळजळ होत असेल तर डोळ्यांच्या डॉक्टरांना त्वरित भेटा. कारण ट्रॅकोमा हा अतिशय गंभीर आजार आहे. आणि ह्याचं वेळीच निदान करून त्यावर उपाय न केल्यास कायमस्वरूपीचं अंधत्व देखील येऊ शकतं.
डोळ्यांची हलकी जळजळ किंवा पापण्यांना खाज येणे ही ह्या आजाराची अगदी प्राथमिक लक्षणं असू शकतात.
पण ह्या आजराची काही इतर लक्षणं खालील प्रमाणे
१) डोळ्यातून घाण किंवा कधी पू बाहेर येणे
२) डोळ्यांच्या पापण्या सुजणे
३) डोळ्यांना प्रकाश सहन न होणे
४) डोळे दुखणे
५) डोळे लाल होणे
६) दृष्टी अंधुक होणे
अर्थात वरील लक्षणं आढळल्यास ट्रॅकोमाच्या व्यतिरिक्त अनेक कारणं असू शकतात. पण म्हणूनच डोळ्यांचं निदान डॉक्टरांकडून करून घेणे कधीही चांगलं
वल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ह्या आजाराच्या पाच स्टेजेस सांगितल्या आहेत.
१) डोळ्याच्या आत पांढऱ्या रंगाचे छोटे गट्ठे दिसणे. डॉक्टरांनी वरचा डोळा वर करून बघितलं तरी हे दिसू शकतात.
२) डोळ्यांचं इन्फेक्शन वाढून डोळ्यांना खूप इरिटेशन येणं सुरु होतं, आणि डोळ्याचा वरचा भाग, पापणी आणि त्या जवळचा सुजायला लागतो.
३) हे इन्फेक्शन अजून वाढलं तर डोळ्याच्या आत पांढरे डाग दिसायला लागतात
४) पुढे हे इन्फेक्शन डोळ्याच्या बाह्यभागाला म्हणजेच कॉर्नियाला घासायला सुरुवात होऊन तिथे इन्फेक्शन पसरायला सुरु होतं
५) इन्फेक्शन पूर्ण कॉर्निया म्हणजे बाह्यभागावर पसरतं
हा आजार कसा रोखता येऊ शकतो
वर म्हणल्याप्रमाणे हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे हातांची आणि डोळ्यांची योग्य स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे
हा आजार मुख्यतः अस्वच्छ भागांमध्ये अधिक पसरतो त्यामुळे घराची आणि आसपासच्या परिसराच्या स्वच्छतेकडे नीट लक्ष द्यायला हवं
उपाय
ह्या आजराचं निदान वेळेत झालं तर ह्याला वेळीच औषधांनी रोखणं सहज शक्य आहे. त्यामुळे वर म्हणल्याप्रमाणे कुठलंही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.
आणि हा आजार फार पुढील टप्य्यात गेला असेल आणि वरच्या पापणीच्या भागात इन्फेक्शनने सूज आली असेल तर मात्र डॉक्टर ऑपरेशनचा पर्याय स्वीकारू शकतात.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6