
डोळ्यांसाठी योगा किती उपयोगी आहे – मागच्या एका लेखात आपण डोळ्यांसाठीच्या व्यायामाबद्दल बोललो होतो, ह्या लेखात आपण डोळ्यांसाठी कोणती योगासनं अथवा प्राणायाम हे लाभकारक आहेत ह्याबद्दल बोलणार आहोत. मागच्या लेखात म्हणलं होतं त्याप्रमाणे आपण सगळे जण डिजिटल युगात जगात जगत आहोत, जिथे गॅझेट्सचा वापर कळत नकळतपणे खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि ज्याचा परिणाम अर्थातच डोळ्यांवर होतो. डोळे कोरडे पडणं, डोळ्यांना चष्मा लागणं ह्या अगदी सर्रास आढळणाऱ्या समस्या आहेत. आपण गॅझेटचा वापर कमी करू शकतो पण अर्थात सध्याच्या जगात तो पूर्णपणे थांबवणं जवळपास अशक्य आहे त्यामुळे डोळ्यांचे व्यायाम आणि ते देखील पारंपरिक योग पद्धतीचे व्यायाम करणं कधीही उत्तम.
चला तर मग डोळ्यांचे काही योग पद्धतीचे व्यायाम प्रकार बघुयात.
पामिंग: तळहातांनी डोळे शेकणे.
डोळे बंद करून शांत बसा व काही दिर्घ श्वास घ्या व सोडा जेणेकरून तुम्हाला पूर्ण विश्रांती मिळेल.
दोन्ही तळहात एकमेकांवर गरम होईपर्यंत घासा. मग गरम तळहात डोळ्यांवर ठेवा.
तळव्यांवरील उर्जा डोळ्यांवर उतरत असताना व डोळ्यांना आराम होताना अनुभवा. तुमचे डोळे सुखकर अंधारात भिजत असल्याचा आनंद घ्या.
तळव्यांवरील संपूर्ण उर्जा डोळ्यांत शोषली जाईपर्यंत याच स्थितीत राहा.
डोळे बंदच ठेऊन हात खाली घ्या.
पुन्हा एकदा तळवे एकमेकांवर घासून हिच प्रक्रिया कमीतकमी तीन वेळा करा.
ब्लीन्किंग: डोळे मिचकावणे.
डोळे उघडे ठेऊन आरामात बसा.
दहा वेळा जलद गतीने पापण्या फडकवा.
नंतर डोळे बंद करून २० सेकंद आराम करा. सावकाश आपले लक्ष्य श्वासाकडे न्या.
हाच व्यायाम पाच वेळा करा
दोन्ही बाजूंना पाहणे
पाय पुढयात सरळ करून बसा.
आता मुठी बंद ठेऊन व हातांचे अंगठे वरच्या दिशेला ठेऊन हात वर उचला.
तुमच्या समोरील डोळ्यांच्या पातळीत असलेल्या एका बिंदूवर नजर स्थिर करा.
ह्या स्थितीत डोके स्थिर ठेवा आणि खालील गोष्टींवर नजर, एकानंतर एकावर फिरवत, केंद्रित करा:
भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
डाव्या अंगठ्याकडे पहा.
पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
उजवा अंगठा
पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
डाव्या अंगठ्याकडे पहा.
असे १०-२० वेळा पुनःपुन्हा करा.
हा व्यायाम झाल्यानंतर डोळे बंद करून आराम करा.
वरील व्यायाम करतेवेळी श्वास शांतपणे घ्या आणि सोडा. श्वास घाईघाईने होत नाहीये ना हे नक्की पहा.
एकाचवेळी दृष्टी समोर व बाजूला वळवणे.
पाय शरिराच्या सरळ रेषेत ठेऊन ताठ बसा.
आता तुमच्या डाव्या हाताची बंद मुठ डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा अंगठा मात्र वरच्या दिशेला सरळ ठेवा.
डोळ्यांसमोरील एका बिंदूवर नजर केंद्रित करा.
याच अवस्थेत डोके न हलवता एक दिर्घ श्वास घ्या.
श्वास सोडा व डाव्या अंगठ्यावर नजर केंद्रित करा.
पुन्हा श्वास घ्या व डोळ्यांसमोरील एका बिंदूवर नजर केंद्रित करा.
आता तीच क्रिया उजव्या हाताचा अंगठा उजव्या गुडघ्यावर ठेऊन करा.
नंतर डोळे बंद ठेऊन आराम करा.
नजर गोल गोल फिरवणे.
पाय पुढयात सरळ करून बसा.
आता तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा.
उजव्या हाताची मुठ करून अंगठा सरळ दिशेत उजव्या गुडघ्यावर ठेवा. हाताचा कोपरा सरळ ठेवा.
याच अवस्थेत डोके न हलवता उजव्या अंगठ्यावर नजर केंद्रित करा.
हाताचा कोपरा सरळ ठेऊन उजव्या अंगठ्याने एक वर्तुळ बनवा.
पाच वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पाच वेळा विरुद्ध दिशेने अंगठा फिरवत हीच क्रिया करा.
हीच क्रिया डावा अंगठा वापरून परत तशीच करा.
डोळे बंद करून त्यांना आराम द्या. पूर्ण विश्राम करा.
ह्या शिवाय प्राणायामातील एक प्रकार भ्रामरी प्राणायाम हा एक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त प्रकार आहे.
भ्रामरी प्राणायाम आपल्या मनाला शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ह्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारतेच पण चिंता, काळजी, नैराश्य ह्यासाठी देखील हा अतिशय उपयुक्त प्राणायाम आहे.
भ्रामरी प्राणायाम कसा करावा ?
घरातील शांत कोपरा शोधून, डोळे मिटून, ताठ बसा.
दोन्ही हातांची बोटं कानांवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या.आणि श्वास सोडा, श्वास सोडताना हलका आवाज काढा, भुंग्याचा जसा आवाज येतो तसा आवाज येईल.
पुन्हा श्वास घ्या आणि असे सहा ते सात वेळा करा.
वरील सर्व व्यायाम प्रकार करून झाल्यावर काही मिनिटे शवासनात पडून राहा आणि पूर्ण विश्रांती घ्या. सावकाश व नेहमीप्रमाणे श्वास घ्या व सोडा. हे व्यायाम करताना कोणताही विचार अथवा कोणतीही संवेदना रोखू नका.
हे केल्यास डोळ्यांचं आरोग्य नक्की सुधारेल
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6