
वर्कफ्रॉम होम मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल – वर्कफ्रॉम होम ही संस्कृती आता खूपच रुजायला लागली. ह्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. आजच्या लेखात वर्क फ्रॉम होम जर तुम्ही करत असाल तर तुमच्या घरातील लाईट कसा असायला हवा जेणेकरून डोळ्यांना कमी ताण येईल ह्याविषयी आपण बोलणार आहोत.
जेंव्हा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असता त्यावेळेस तुमच्या कम्प्युटरसाठी उत्तम डेस्क, योग्य खुर्ची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळ्यांवर ताण येणार नाही आणि तुमचा मूड टिकून राहील अशी व्यवस्था केलेली असते. ह्यासाठी ह्या विषयातील अनेक तज्ज्ञ काम करत असतात. पण जेंव्हा आपण घरातून अगदी आपल्या बेडरूममध्ये बसून काम करत असतो त्यावेळेला ह्याचा विचार झालेला असतोच असं नाही. आणि अनेकदा आपल्या पण लक्षात येत नाही की अपुऱ्या प्रकाशात काम करत आहोत, ज्याने डोळ्यावर नकळत ताण येत राहतो आणि मग चष्म्याचा नंबर लागणे, जर चष्मा असेल तर त्याचा नंबर वाढणे, किंवा डोळे किंवा डोकं दुखणं अशा तक्रारी सुरु होतात. आणि म्हणून काही घरातून काम करताना घरातील लायटिंगचा कसा विचार करा ह्याविषयीचे काही सल्ले
१) घरात ज्या ठिकाणी काम करत असाल तिकडे मुबलक सूर्यप्रकाश आहे का हे पहा जर तो नसेल तर शक्यतो तशी जागा निवडा. कोणत्याही कृत्रिम लाईट्सपेक्षा स्वच्छ सूर्यप्रकाश हा कधीही चांगला.
२) जर संध्याकाळी काम करणार असेल तर टेबल लॅम्प किंवा एखादा थेट लाईटचा सोर्स येईल असं पहा. लाईटचा झोत किती आहे हे Lux ह्या परिमाणात मोजतात. १ Lux म्हणजे १ स्क्वेअर मीटरमध्ये पडणारा लाईट. टेबल लॅम्प हा ३०० lux चा असावा आणि त्यातली प्रखरता किंवा शीतलता सेट करण्याचा पर्याय असतो, ते पर्याय समजून घ्यावेत.
३) घरी शक्यतो न्यूट्रल व्हाईट लाईट असेल असं पहावं. खूप प्रखर आणि निळ्या रंगाच्या शेडचा लाईट शक्यतो टाळा कारण त्याने डोळ्यावर ताण येतो. आणि अति प्रखर लाईट तर जरूर टाळा.
४) तुम्हाला वर्क फ्रॉम होमचा आनंद घ्यायचा असेल तर मग तो टेबल लॅम्प घ्या किंवा एखादा लाईट बसवून घ्या तो चांगल्या क्वालिटीचा असेल हे नक्की पहा.
काय चुका टाळाव्यात
१) डोक्यावरचे स्पॉटलाईट अजिबात वापरू नका. तुमचीच सावली पडत राहते आणि त्याचा डोळ्यांना आणि एकाग्रतेला त्रास होऊ शकतो.
२) पारंपरिक फ्लुरोसंट लाईट अजिबात वापरू नका कारण त्याने डोळ्यावर ताण येऊन हमखास डोकं दुखायला लागण्याची शक्यता असते
ह्या चुका टाळल्यात तर आणि वर सांगितलेले नियम लक्षात ठेवलेत तर वर्क फ्रॉम होम तुमच्या डोळ्यांसाठी आनंददायी असेल
तरीही वर्कफ्रोम होम करताना डोळ्यावर ताण येणार तेंव्हा मागे सांगितलेले साधे उपाय लक्षात ठेवा
१) दर अर्ध्या तासाने कम्युटर स्क्रीनवरून नजर हटवून एक ५ मिनिटं डोळ्यांना विश्रांती द्या
२) डोळे स्वच्छ पाण्याने धुवत रहा
३) डोळ्यावर थंड पाण्याच्या किंवा दुधाच्या घड्या ठेवा
आणि मग बघा तुमचं वर्कफ्रॉम होम कसं डोळ्यांना सुखावणारं असेल
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6