
स्क्रीन टाइम मुळे डोळ्यांना होणारा त्रास – हल्ली कम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीन्स वापरण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की अगदी लहान वयात मुलांना चष्मा लागण किंवा डोळे दुखणं ह्या समस्या अगदी सर्रास आढळून येतात.
अगदी लहान वयात मुलांना जवळचं किंवा लांबच स्पष्ट दिसण्यात अडचणी यायला लागतात. हे टाळणं शक्य आहे, अर्थात त्यासाठी जसं मुलांच्या आहारात सगळे पौष्टिक पदार्थ हवेत, त्यांना मोबाईल स्क्रीन्स पासून गरज नसेल तेंव्हा दूर ठेवायला हवं आणि त्यांना डोळ्यांचे व्यायाम पण शिकवायला हवेत. हे डोळ्यांचे व्यायाम जर मुलांनी योग्य वयात सुरु केले तर डोळ्यांची शक्ती आपोआपच वाढेल.
हे डोळ्यांचे व्यायाम काय आहेत हे समजून घेण्याच्या आधी आपण ह्या व्यायामाचे फायदे आधी समजून घेऊया. जसं शरीराला व्यायामाची आवश्यकता आहे आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांचं शरीर हे चांगलं राहतं, तसंच डोळ्यांच्या व्यायामाचं देखील आहे.
तुम्ही तुमच्या डोळ्यांना योग्य आणि पुरेसा व्यायाम नियमित दिलात तर तुमचे डोळे नक्की चांगले राहतील. मुळात जे व्यायाम मी इथे सांगणार आहे त्याला कुठल्याही महागड्या उपकरणांची गरज नाही आणि हे अगदी बसल्या बसल्या, घरच्या घरी पण होऊ शकतात. हे व्यायाम जर नियमित केले तर डोळ्यांचे आरोग्य सुधारेलच पण त्यावर आलेला ताण पण हलका होतो.
म्हणूनच आपण डोळ्यांच्या व्यायामाचे प्रकार समजवून घेऊया
१) पेन्सिल एक्झरसाईज :- एक मध्यम आकाराची पेन्सिल एका हाताच्या लांबीवर धरा आणि तिच्यावर लक्ष केंद्रित करा.हळूहळू पेन्सिल नाकाच्या जवळ आणा. जोपर्यंत पेन्सिलवर फोकस करू शकत नाही तोपर्यंत पेन्सिल दृष्टीपासून दूर न्या. हा व्यायाम दिवसातून 9 ते 10 वेळा केला जाऊ शकतो.
२) क्लॉक एक्झरसाईज :- डोळे हळूहळू काही सेकंदांसाठी क्लॉकवाईज गोल गोल फिरवायचे आणि काही सेकंदांनी हळूहळू अँटीक्लॉकवाईज दिशेने गोल गोल फिरवायचे. कमकुवत दृष्टी सुधारण्यास मदत करणारा हा व्यायाम दिवसातून चार ते पाच वेळा केला पाहिजे.
३) पापण्यांची उघडझाप करणे
हा व्यायाम कोरड्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. स्क्रीनकडे एकटक बघत राहिल्याने डोळे आळशी होतात आणि पापण्यांची उघडझाप जितकी व्हायला हवी तितकी होत नाही. यामुळे डोळे कोरडे पडतात व चुरचुरतात.
यासाठी हा व्यायाम केला पाहिजे. 20 ते 30 वेळा वारंवार डोळे मिचकावून पापण्या वेगाने फडफडवण्याचा प्रयत्न करा. यानंतर डोळ्यांना थोड्यावेळ विश्रांती देण्यासाठी थोड्यावेळ डोळे बंद ठेवून शांत बसा. हे दिवसातून दोनदा केले पाहिजे.
४) स्विंगिंग आय एक्सरसाइज
दोरी किंवा तारेच्या मदतीने बॉल टांगून ठेवा जेणेकरून तो तुमच्या नाकाच्या उंचीपर्यंत येईल. बॉल स्विंग करा आणि तो जवळून बघा.डोळ्यांनी चेंडूची हालचाल फॉलो करा.
५) सूर्यप्रकाशात जाणे
सूर्यप्रकाश असताना बाहेर जा आणि सूर्याच्या दिशेने उभे राहून डोळे बंद करा. तुमच्या बंद पापण्यांवर सूर्यप्रकाश पडू द्या. हा व्यायाम दररोज काही मिनिटांसाठी करा. सकाळच्या कोवळ्या उन्हात हा व्यायाम करणे सगळ्यात उत्तम आहे.
६) बाऊन्सिंग बॉल एक्झरसाईज :- मुलांना बॉल जमिनीवर एका हाताने फेकून दुसऱ्या हाताने तो पकडायला सांगा किंवा एका हातातून दुसऱ्या हातात बॉल खेळत रहायला सांगा, आणि ह्यावेळेला बॉलच्या हालचालींकडे मुलांना आपली नजर फोकस करायला शिकवा.
ह्यापैकी कोणताही व्यायाम मुलांकडून मर्यादित पण नियमित करून घ्या. शक्यतो मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली ते होतील असं बघा आणि डोळ्यांचा व्यायाम इतकाच करा ज्यातून आनंद मिळेल पण अनावश्यक ताण येणार नाही.
डोळ्यांचा नियमित व्यायाम केल्याने केवळ डोळ्यांवरचा ताणच कमी होत नाही तर मुलांचे लक्ष आणि एकाग्रता सुधारण्यास देखील मदत होते. म्हणून, तुमच्या मुलांना त्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्याचे महत्त्व पटवून द्या आणि त्यांना दृष्टी सुधारण्यासाठी हे सोपे डोळ्यांचे व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6