होळी मध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्याल

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रंग खेळणे, एकमेकांवर पाणी उडवणे ह्याची मुलांना खूप मजा वाटत असते. माझी पिचकारी ही इतरांपेक्षा कशी भारी आहे हे लहान मुलं एकमेकांना दाखवत असतात. थोडक्यात होळी आणि रंगपंचमीचा सण हा लहान मुलांसाठी आनंदाचा सण आहे. पण नीट काळजी न घेतल्यास हा त्रासाचा सण ठरू शकतो, मुलांसाठी आणि पालकांसाठी …

#image_title

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. रंग खेळणे, एकमेकांवर पाणी उडवणे ह्याची मुलांना खूप मजा वाटत असते. माझी पिचकारी ही इतरांपेक्षा कशी भारी आहे हे लहान मुलं एकमेकांना दाखवत असतात. थोडक्यात होळी आणि रंगपंचमीचा सण हा लहान मुलांसाठी आनंदाचा सण आहे. पण नीट काळजी न घेतल्यास हा त्रासाचा सण ठरू शकतो, मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा. त्यामुळे येत्या होळी आणि रंगपंचमीच्या सणाला लहान मुलांच्या डोळ्याची विशेष काळजी घ्या.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील मुलांना जाणीव करून द्या पिचकारीने पाणी उडवण्याचा आनंद लुटताना कोणाच्याही चेहऱ्यावर पिचकारीने पाणी मारू नका, त्याने त्याच्या सवंगड्यांच्या डोळ्यात जोराने पाणी जाऊ शकतं आणि डोळ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. मुलं एकमेकांना रंग लावताना शक्यतो पालकांनी समोर असणं गरजेचं आहे कारण डोळ्यात रंग जात नाहीये ना हे जरूर पहा.

मुलांना रंग खेळायला पाठवताना शक्यतो गॉगल घालून पाठवता आलं तर उत्तम. रंग खेळताना उन्हात बाहेर असल्यामूळे डोळे कोरडे पडू शकतात, त्यामुळे डोळ्यांत एखादं ल्युब्रिकंट औषध घालता आलं तर उत्तम. ज्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येणार नाही आणि मुलं डोळे ताणणार नाहीत आणि त्यांच्या डोळ्यात रंग जाणार नाही.

होळीचे रंग खेळून मुलं घरी आल्यावर त्यांच्या डोळ्याभोवती साचलेला रंग हलक्या हाताने स्वच्छ करा. समजा इतकं करून देखील डोळ्यात रंग गेला किंवा पाण्याचा फवारा डोळ्यात गेला तर मुलांना डोळे चोळू देऊ नका. प्रथम थंड पाण्याने डोळे हलक्या हाताने धुवायला लावा आणि कोरड्या स्वच्छ फडक्याने डोळे टिपून घ्या. त्यानंतर काही काळ डोळ्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवा जेणेकरून डोळ्यांची होणारी आग कमी होईल.

जर समजा इतकं होऊन देखील जर आग कमी झाली नाही किंवा डोळ्यांची लाली कमी झाली नाही किंवा डोळ्यातून पाणी येतच राहिले तर तर मात्र जवळच्या डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


जर तुमच्या मुलांना चष्मा असेल तर तो चष्मा न लावता पण एखादा साधा गॉगल त्यांना रंग खेळायच्या आधी लावायलाच लावा.

होळीच्या नंतर खालील तक्रारी सर्रास आढळतात
डोळ्यांच्या बाहुलीच्या पातळ पडद्याला ओरखडा जाणे
डोळ्यांमध्ये रासायनिक जळजळ होणे
अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस (रसायनाची अॅलर्जी असल्यामुळे डोळ्याच्या सर्वात बाहेरच्या पारदर्शक स्तराला सूज येणे)
पाण्याचा फुगा लागल्याने डोळ्यांना धक्का लागणे आणि डोळ्याच्या आतील बाजूस रक्तस्त्राव होणे, डोळ्याच्या भिंगाची जागा बदलणे, रेटिना विलग होणे (रेटिना हा डोळ्याचा छायासंवेदनशील स्तर विलग होणे), मॅक्युलर एडिमा (रेटिनाच्या मध्यवर्ती भागाला सूज येणे).

ह्यातलं काहीही लक्षण दिसलं तर ही डोळ्यांची गंभीर तक्रार आहे असं समजून डोळ्यांच्या डॉक्टरकडे तात्काळ धाव घ्या.

हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे त्यात रंगाचा बेरंग होऊ देऊ नका !

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Book a Consultation

It’s easy and free!
admin

admin

Resolving mercedes sprinter dpf problems efficiently. Male doberman puppy (knight) with cropped ears & docked tail.