आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी

Army Navy Vision

मागच्या लेखात आपण. वैमानिक होण्यासाठी तुमच्या दृष्टीची क्षमता कशी असावी लागते आणि त्यासाठीचे काय निकष पाळले जातात याबद्दल बोललो. या लेखात आपण सैन्यदलात आणि नौदलात जाण्यासाठी काय निकष तपासले जातात हे पाहूया. सर्वप्रथम सैन्यदलात जाण्यासाठी काय दृष्टीचे काय निकष बघितले जातात.


१) सैन्यदलात भरती होणाऱ्यांची दूरची नजर किंवा दूरच दिसण्याची क्षमता ही उत्तम असावी लागते. यासाठी २०/२० हा निकष लावला जातो म्हणजे साधारणपणे २० फुटापर्यंतच जर तुम्ही स्वच्छ बघू शकत असाल तर तुम्ही पायलट होण्यासाठी योग्य आहात असं मानलं जातं. यासाठी तुमची निवड होण्याच्या आधीच तुमच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. जसं डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चार्टकडे बघून त्यावरची अक्षरं वाचता तशाच पद्धतीच्या चाचण्या घेतल्या जातात

२) उमेदवाराच्या जवळच्या चष्म्याचा नंबर हा २.५ पेक्षा जास्त असू नये.

३) सगळे रंग डोळ्यांना नीट बघता यायला हवेत.

४) उमेदवार किंवा त्याच्या घरात कोणाला रातांधळेपणा नाही याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं.

५) लॅसिक किंवा तत्सम कुठलंही ऑपरेशन झालेलं नाही हे देखील तपासलं जातं.



आता नौदलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला दृष्टीचे काय निकष लावले जातात ते बघूया


१) भारतीय सैन्यात जे निकष लावले जातात तेच इथे देखील लावले जातात ते म्हणजे २० फुटापर्यंतच्या गोष्टी उमेदवाराला स्वच्छ दिसल्या पाहिजेत, वाचता आल्या पाहिजेत

२) उमेदवाराचा जवळचा चष्म्याचा नंबर ०.७५ पेक्षा जास्तीचा असता कामा नये दीड पेक्षा जास्त लांबचा नंबर असू नये

३) ग्रेड ३ ची बायनॉक्युलर व्हिजन असायला हवी आणि रंगांधळेपणा बिलकुल नसावा.

मुळात ज्यांना सैन्यात किंवा नौदलात जायची इच्छा आहे त्या तरुण-तरुणींनी डोळ्यांची काळजी अगदी लहानपणापासून घ्यायला हवी. खूप दीर्घकाळ टीव्ही पाहणे किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन पाहणे टाळायला हवं कारण याने डोळ्यांवर ताण येऊन तुम्हाला चष्मा लागू शकतो.  २०-२०-२० चा नियम पाळणे. दर वीस मिनीटांनी २० सेकंदांसाठी २० फुटांवरची एखादी वस्तू बघायचा प्रयत्न करा किंवा अगदी ते शक्य नसेल तर २० सेकंद डोळे मिटून घ्या जेणेकरून डोळ्यावर अनावश्यक ताण येणार नाही.  डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांना कोरडेपणा येऊ नये म्हणून एखादं ल्युब्रिकंट औषध जरूर घालत रहा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहमी पुरेशी म्हणजे रात्रीची ७, ८ तासांची झोप घ्या आणि कायम पोषक आणि चौरस आहार घ्या, ज्यात मुख्यतः भाज्या फळे, अंडी यांचा समावेश करा.

हे सगळं केलं तर तुमच्या सैन्य किंवा नौदलात जाण्याच्या स्वप्नात तुमची दृष्टी कधीच अडथळा ठरणार नाही.

Fishing. Walgreens pharmacy island lake, illinois. Auto accident injury.