ब्लू लाईट चे परिणाम

Blue light Effect on Eyes

डोळा हा शरीरातील संवेदनशील अवयव आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कोव्हिडनंतर घराघरांमध्ये लॅपटॉप, टीव्हीचे एलईडी स्क्रीन्स आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटातील लोकांचं खूपच वाढलं आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांची शाळाच कम्प्युटर स्क्रीनवर भरत होती त्यामुळे तर ह्या मुलांचा स्क्रीनसमोरचा काळ हा चिंता करण्याइतका वाढला आहे. त्यात मोठ्या वयाच्या लोकांना सातत्याने खिशातून मोबाईल काढून काही ना काही बघत राहणं, उशिरापर्यंत ओटीटी स्क्रीन्स बघणं ह्या सवयी जडल्या आहेत. हे सगळं डोळ्यांना घातक आहे का? तर हो, ह्या सगळ्या डिव्हायसेसमधून येणारा निळ्या रंगाचा प्रकाश हा तुमच्या डोळ्यांना एका मर्यादे पलीकडे जर त्याचा वापर झाला तर घातक ठरू शकतो. कसं ते समजून घेऊया.

दिवसाला सलग अनेक तास कुठल्याही स्क्रीनच्या समोर बसण्याची सवय असल्यास मध्येच डोळ्यांना धूसर दिसणं, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणं, डोकेदुखीचा त्रास कधी कधी डोळ्यातून पाणी येणं तर कधी डोळे कोरडे पडल्याचा त्रास जाणवणं, अशा अनेक प्रकारांनी डोळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाशी तुमच्या डोळ्यांचा जर खूप जास्त वेळ संबंध आला तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर पण होऊ शकतो. पण हे सगळं होत असताना ह्या स्क्रिन्समधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचे काही फायदे पण अभ्यासकांनी सांगितले आहेत ते म्हणजे जेंव्हा संध्याकाळी तुमचा मेंदू थकलेला असतो आणि तरीही तुम्हाला काम करावंच लागतं, अशावेळेस मेंदूचा थकवा ह्या निळ्या प्रकाशामुळे कमी होतो आणि तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची तरतरी जाणवते. जसा स्क्रिन्समधून निळा प्रकाश परावर्तित होतो तसाच तो सूर्याकडून पण होत असतो, अर्थात सूर्याकडून होणारा प्रकाश हा कम्प्युटर स्क्रीनचा प्रकाशापेक्षा खूप अधिक असतो. हा निळा प्रकाश तुमची स्मरणशक्ती वाढवायला मदत करतो.

हे काही चांगले फायदे असले तरी दीर्घकालीन तोटे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून काही सोपे नियम आणि सवयी पाळल्यास डोळ्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

१) स्क्रीन मग तो कम्प्युटरचा असो, मोबाईलचा किंवा घरातील एलईडी टीव्हीचा, त्याला डोळ्याच्या अगदी जवळ घेऊन बघू नका. लहान मुलं असोत की मोठी माणसं डोळ्याच्या अगदी जवळ स्क्रीन घेऊन बघण्याची त्यांना सवय असते, ही सवय टाळाच.

२) रात्री अंधारात किंवा जिथे कुठे कमी प्रकाश असेल अशा ठिकाणी स्क्रिन्सकडे बघणं शक्यतो टाळा.

३) २०-२०-२० चा फॉर्म्युला जरूर वापरा :- सलग २० मिनिटं स्क्रीनकडे बघितल्यावर  २० फुटावरील एखाद्या वस्तूकडे किमान २० सेकंद बघा किंवा किमान २० सेकंद डोळे मिटून घ्या

४) स्क्रीनचा वापर तुम्हाला टाळता येणारच नसेल तर डोळे दर दोन तासांनी थंड पाण्याने धुवून घ्या

५) डोळ्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवा जेणॆरून डोळ्यांवर आलेला ताण कमी होईल

६) आणि डोळ्याच्या डॉक्टर्सच्या सल्ल्याने स्क्रीन्ससाठी योग्य असा चष्मा निवडा.

हे सगळे नियम पाळलेत तर डोळ्याचं आरोग्य नक्की नीट राहील आणि स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश तुमचा मित्र ठरेल, शत्रू नाही. 

Fishing. walgreens pharmacy island lake, illinois. What damages can i claim in a michigan uninsured motorist claim ?.