
सध्याच्या कम्प्युटर युगात ऑफिसमध्ये सलग १०,१२ तास कम्प्युटरसमोर बसून काम करणं, मग घरी आल्यावर पुन्हा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसणं आणि उशिरा झोपणं आणि सकाळी पुरेशी झोप झालेली नसताना पुन्हा कामावर जाणं, ह्यामुळे शरीरावर ताण येतोच, पण डोळ्यांवर देखील खूप ताण येतो. मग हळूहळू डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसायला लागतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मेकअपद्वारे ती झाकायचा प्रयत्न करतो. पण डोळ्यांभोवती काळी वर्तुळं हा काही गंभीर आणि हल्ली सर्रास दिसणारा प्रकार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.
मुळात डोळ्याभोवतो काळी वर्तुळं का तयार होतात आणि त्यामागची कारणं समजवून घेऊया
१) लॅपटॉप/मोबाईल स्क्रीनचा अतिवापर :- लॅपटॉप टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डार्क सर्कलसाठी कारणीभूत ठरते. स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात.
२) झोप पूर्ण न होणं :- झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण काम, डिजीटल साधनं हाताळण्यात जाणारा वेळ यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं.
३) अति मेकअपचा वापर :- अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात
४) सनस्क्रीन लोशनचा वापर न केल्यामुळे
५) गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय
६) आहारातील मीठाचं प्रमाण अति असणं
६) अति प्रमाणात धूम्रपान
७) ह्या शिवाय वय किंवा अनुवंशिकता ही देखील महत्वाची कारणं आहेत
८) पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं हे देखील ह्या समस्येचं अजून एक महत्वाचं कारण असू शकतं
ह्या समस्येवर उपाय काय ?
मुळात कम्प्युटर स्क्रीनचा अतिवापर टाळा. गरज नसेल तेंव्हा स्क्रीनपासून दूर रहा. किमान ७, ८ तासांची झोप घ्या ज्यामुळे डोळ्याच्या खालच्या नाजूक त्वचेवर ताण येणार नाही.
पण काही घरगुती उपायांनी आणि अर्थात वर सांगितलेल्या सवयी जर नीट पाळल्या तर मात्र ह्या घरगुती उपायांच्या जोरावर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी होऊ शकतात.
१) डोळ्यांवर थंड दुधाच्या किंवा पाण्याच्या घड्या ठेवा
२) दिवसातून दोनदा डोळ्यांवर काकडीचे काप ठेवणे
३) झोपताना खोबरेल तेल किंवा बदल तेल हलक्या हाताने डोळ्यांच्या त्वचेच्या खाली लावा आणिझोपून जा. दुसऱ्या दिवशी अगदी सावकाशपणे ते तेल पुसून टाका
४) डोळ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवल्याने देखील फरक पडू शकतो.
पण हे केल्याने देखील जर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी होत नसतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.