
मागच्या एका लेखामध्ये आपण डोळ्यांसाठी पोषक आहार कोणता ह्याबद्दल बोललो होतो. तो आहार हा एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार कोणता हा विचार करून लिहिलेला लेख होता. पण हल्ली मोतीबिंदू हा डोळ्यांचा अगदी सर्रास आढळणारा आजार आहे. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन्सची सुविधा अगदीच सोपी झाल्यामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेण्याचं प्रमाण देखील चांगलंच वाढलं आहे. मागे आपण एका लेखात मोतीबिंदू ऑपरेशनबद्दल बोललो होतो पण हे ऑपरेशन झाल्यावर त्यातून लवकर डोळ्यांच आरोग्य झपाट्याने सुधारावे असं वाटत असेल तर त्याला पोषक आहाराची जोड पण द्यायला हरकत नाही. तर मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा?
• फायबर
आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यास आपल्याला आहारामध्ये फायबर समाविष्ट करणे खूपच महत्त्वाचे असते..आपल्याला जर डोळ्यांच्या ऑपरेशननंतरची रिकव्हरी उत्तम करायची असेल आहारात फायबरचा नक्की समावेश करा. फायबर हे मुख्यतः फळं, भाज्या आणि त्यात देखील पालेभाज्यांमध्ये आढळतं. त्यामुळे मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर आहारात फळं. पालेभाज्या मुबलक प्रमाणात घ्या.
• दुग्ध उत्पादने
दूध हे प्रथिन यांचे उत्तम स्रोत मानले जाते. दूध हे शस्त्रक्रिया नंतर खूपच चांगले असते. बऱ्याच लोकांना असे आढळून आले आहे की शस्त्रक्रियेनंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही खूपच चांगल्या प्रकारे वाढत आहे. म्हणूनच आपलं जर मोतीबिंदू ऑपरेशन झाले असेल तर आपण दूध उत्पादने खाण्याचा नेहमी प्रयत्न करावा.
• जीवनसत्व सी
C जीवनसत्व एक चांगले अँटिऑक्सिडंट आहे. या जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य नियमित चांगले राहत असते.पुरेशा प्रमाणामध्ये हे जीवनसत्व जर आपल्या आहारामध्ये असेल तर मोतीबिंदू होण्यापासून देखील आपण वाचू शकतो. पण मोतीबिंदू होऊन त्याचं ऑपरेशन झालं असेल तर योग्य रिकव्हरीसाठी व्हिटॅमिन सी कधीही उत्तम. ‘व्हिटॅमिन सी’साठी आहारात मोड आलेली कडधान्य हिरव्या पालेभाज्या आंबट फळे आणि पेरू यांचा समावेश नक्की करा.
• ओमेगा थ्री फॅटी ऍसिड
आपण आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर डोळे कोरडे होणे यापासून आपली सुटका मिळत असते. तसेच डोळ्यांची हानी ही एक मोठी समस्या आहे त्यामुळे आपल्याला अंधुक देखील दिसू लागते.यामुळे आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. हे आपल्याला मासे, शेंगदाणे,अक्रोड, जवस ह्यातून चांगल्या प्रकारे मिळत असते.
• फळे
ताजी फळे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. नेहमी आपण प्रक्रिया न केलेले फळे खाण्याचा प्रयत्न करावा. मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर फळे आपण नक्की खावे. अर्थात फळं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
• जीवनसत्व अ
अ जीवनसत्व मेदा मध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. काही पदार्थांमध्ये हे जीवनसत्व नैसर्गिक रित्या आढळून येत असते. अ व्हिटॅमिन डोळ्यांच्या आरोग्याला अतिशय आवश्यक असं जीवनसत्व आहे. गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, अंडे यामध्ये ए जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते.
वर सांगितलेले पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकलात तर तुमचं डोळ्यांचं एकूणच आरोग्य चांगलं राहीलच पण त्याही पलीकडे मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळ्यांची रिकव्हरी उत्तम होईल.