
मुंबई महापालिका एक नवीन धोरण बनवत आहे, त्या धोरणानुसार डिजिटल जाहिरात फलक रात्री ११ नंतर बंद केले जातील आणि तसं न केल्यास जाहिरात कंपनीवर कारवाई केली जाईल. डिजिटल जाहिरात फलकांवर सतत चित्र बदलत असतात आणि त्याच्या प्रखर प्रकाशामुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात. मागे एका लेखात आपण नमूद केलं होतं की एलईडी लाईट्स, लेसर लाईट्सच्या सतत संपर्कात आल्यामुळे निद्रानाश होणे, मूड बदलत राहणे, इतकंच काय पण पचनाच्या देखील अनेक तक्रारी उद्भवू शकतात. आणि या विषयीचा एक मोठा अभ्यास जगभरात सुरु आहे.
लेझर लाईट असो की डिजिटल फलकांवरचे लाईट, सलग खूप काळ डोळ्यांनी पाहिला तर नक्की डोळ्यावर काय परिणाम होतो ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
अमेरिकन अॅकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी’च्या अहवालानुसार पाच मिलिवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या ‘लेझर लाइट’मुळे नेत्रपटल खराब होण्याची शक्यता असते.
मुळात डिजिटल बिलबोर्डवरच्या प्रखर प्रकाशाकडे पाहून डोळ्यांना काय त्रास होऊ शकतो याची माहिती घेऊया डोळ्यांवर ग्लेअर येणे किंवा अंधुक दिसणं :- अचानक तुमच्या डोळ्यावर जर डिजिटल बोर्डावरचा प्रखर प्रकाश डोळ्यात गेला तर तुमच्या डोळ्यांना एकदम अंधुक दिसायला लागतं किंवा अचानक सुन्न झाल्यासारखं वाटतं.
डोळ्यांवर ताण येणे :- डोळ्यांवर सतत प्रखर निळा किंवा कुठलाही रंगीबेरंगी प्रकाश पडला तर डोळ्यांवर ताण यायला लागतो, आणि त्याची पहिली खूण असते ते म्हणजे डोकं दुखायला लागतं, डोळे दुखायला लागतात.
डोळे कोरडे पडणे :- प्रखर लाईट डोळ्यात जाऊन डोळे कोरडे पडतात, त्यामुळे डोळ्यांना खाज येणे, थोडंसं अंधुक दिसणे असे प्रकार देखील घडू शकतात.
अस्वस्थ झोप :- सतत डोळ्यावर प्रखर प्रकाश पडल्यामुळे झोप नीट न लागणे, अस्वस्थ झोप लागणे हे प्रकार हे होऊ शकतात. आणि कमी झोपेमुळे डोळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
लेझर लाईटकडे खूप वेळ पाहिल्याने कोणाच्या नेत्रपटलावर किंवा कोणाच्या बुबुळावर परिणाम होतो. काही ठिकाणी तर बुब्बुळावर इजा होऊन रक्त्तस्त्राव झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. लेझर लाइटकडे एकटक पाहिले की लेझर लाइटचे किरण त्याच्या नेत्रपटलाच्या मध्यभागी पडल्याने उष्णता तयार होऊन पडद्याला जखम करू शकतात. नेत्रपटलाच्या खाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यांना इजा पोहोचल्याने नेत्रपटलाखाली रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. रक्तस्त्राव झाल्याने वाचनशक्ती आणि डोळ्यांची क्षमताही कमी होऊ शकते. आणि ह्यातील सर्वात दुःखद भाग म्हणजे एकदा का दृष्टी कमी झाली की ती पूर्ववत होईल ह्याची खात्री देता येत नाही.
मुळात लेझर लाईट असो की कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा तत्सम कुठल्याही वस्तूकडे पाहताना त्यातील निळा प्रकाश तुमच्या डोळ्यात शिरतच असतो. तो प्रकाश शिरायला लागला की कधीतरी डोळ्यावर अतिरिक्त ताण येऊन डोळे दुखायला लागणे, अचानक अंधुक दिसायला लागणे किंवा डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणं जाणवू लागतात. असं जाणवायला लागलं तर चटकन डोळे मिटून घ्यावेत आणि त्या जागेपासून दूर जायला हवं.
आणि यापैकी कुठलाही त्रास व्हायला लागला तर अजिबात वेळ न घालवता डोळ्यांच्या डॉक्टरकडे जायलाच हवं कारण एकदा दृष्टी अधू झाली की पुन्हा ती पूर्ववत करणं जवळपास कठीण होतं.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6