
डोळे कोरडे पडण्याची समस्या ही अगदी सर्रास आढळून येते. डोळे कोरडे पडण्याचं महत्वाचं कारण डोळ्यात पुरेसे अश्रू निर्माण न होणे किंवा जे अश्रू निर्माण होत आहेत, त्याची गुणवत्ता पुरेशी चांगली नसणं. आपल्याला डोळ्यातले अश्रू म्हणलं की रडणंच आठवतं आणि रडणं चांगलं नाही असं देखील वाटू शकतं. पण अश्रूचा इथे अर्थ डोळ्यात पुरेसा ओलावा नसणे. हा ओलावा असणं किंवा डोळ्यात पुरेसे अश्रू निर्माण होणं, हे अतिशय आवश्यक आहे, याचं कारण हा ओलावा किंवा अश्रू डोळ्याचा पृष्ठभाग चांगल्या स्थितीत ठेवतात, एखादा बाहेरच्या घटक डोळ्यात गेला तर आपल्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं आणि तो घटक आपोआप निघून जातो. थोडक्यात डोळ्यांचा ओलावा टिकणं हे अतिशय आवश्यक आहे. पण नेमकं हेच न झाल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या अगदी सर्रास आढळते.
डोळे कोरडे पडण्याची सर्वसामान्य कारणे
१) वृद्ध व्यक्तींच्या बाबतीत साधारणपणे वयाच्या साठीनंतर शरीरातील स्निग्धता कमी होऊ लागली की आपोआपच त्याचा परिणाम शरीरावर पण होऊ लागतो.
२) रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या डोळ्यामंध्ये कोरडेपणा आल्याचं अगदी सर्रास आढळतं.
३) डोळ्याला दुखापत झाली असेल तर डोळा कोरडा पडू शकतो.
४) खूप उष्ण वातावरणांत राहिलं तर त्याचा परिणाम म्हणून डोळे कोरडे पडू शकतात. किंवा खूप कोरड्या हवेत राहिल्याने पण हा त्रास जाणवू शकतो.
५) मधुमेही रुग्ण, तसेच संधिवाताच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या बाबतीत पण डोळे कोरडे पडू शकतात.
६) शरीरात अ जीवनसत्वाचं प्रमाण कमी झालं तरी डोळे कोरडे पडू शकतात.
७) सतत कम्प्युटर किंवा कोणताही स्क्रीन बघितला तरी तात्पुरते डोळे कोरडे पडल्यासारखं जाणवतं.
८) कधी एखाद्या औषधाची ऍलर्जी येऊन पण डोळे कोरडे पडू शकतात.
९) कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्यांचे डोळे कोरडे पडण्याचं प्रमाण खूप आहे.
यावर उपाय कोणते ?
१) डोळे कोरडे पडायला लागलेत असं जाणवलं किंवा ते टाळायचं असेल तर दिवसातून किमान २ ते ३ वेळा डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवा. डोळे कोरडे पडण्यावरचा हा सगळ्यात सोपा उपाय आहे.
२) जे मी अनेक लेखांमध्ये सांगत आलो आहे तेच पुन्हा सांगतो की सतत स्क्रीनकडे बघणं टाळा. साधारणपणे दर अर्ध्या तासाने किमान १ मिनिटं तरी डोळे बंद ठेवा. जर तुमचं काम कम्प्युटरशी निगडित असेल तर डोळ्यांवर रोज न चुकता थंड पाण्याच्या घड्या ठेवा.
३) कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर जितका कमी करता येईल तितका करा. जर तुम्ही बाहेर कामाच्या ठिकाणी त्या लेन्सेस वापरत असाल तर तिचा वापर तितकाच मर्यादित ठेवा. घरी आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी घरी त्या वापरणं शक्यतो टाळाच.
४) एखादं औषध घेतल्याने जर डोळे कोरडे पडत असतील तर तात्काळ संबंधित डॉक्टरचा सल्ला घ्या
५) उन्हाळाच्या दिवसांत घराबाहेर पडताना कायम गॉगल घाला.
६) जर तुमच्या कामाचं स्वरूप हे डोळ्यावर ताण आणणारं असेल तर डोळ्याच्या डॉक्टर्सच्या सल्ल्याने एखादं डोळ्यात घालायचं औषध नियमित वापरू शकता.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
पण वरील उपाय करून देखील जर डोळ्यांचा कोरडेपणा कमी होत नसेल तर मात्र डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यकच आहे. आणि त्यात पुन्हा रजोनिवृत्तीच्या जवळ आलेल्या स्त्रिया किंवा वयाची साठी पार केलेल्या व्यक्तींनी डोळ्यांच्या कोरडेपणाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6