
दृष्टी अर्थात डोळे हे सुंदर जग पाहण्यासाठी मिळालेलं एक वरदानच आहे. डोळे हे मानवाच्या नाजूक अवयवांपैकी एक असतात. याची विशेष काळजी घ्यावी लागते.
पण हल्ली कम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीनच्या जगात दिवसाच्या दिवस कम्प्युटर स्क्रीनसमोर किंवा काम करून झाल्यावर रात्री टीव्ही किंवा तशाच दुसऱ्या एखाद्या स्क्रीनसमोर डोळे लावून बसल्यामुळे डोळ्यांवर कमालीचा ताण येतो आणि त्यातून काही समस्या उद्भवतात, त्यातलीच एक समस्या म्हणजे डोळ्यांच्या खाली पिशवीसारखा थर जमा होणे.
ह्यात डोळ्यांवर अनावश्यक ताण पडल्यामुळे डोळ्याभोवतीची त्वचा गडद होते आणि त्यातून डोळ्यांच्या पिशव्या तयार होतात. जेव्हा डोळ्याची पिशवी तयार होते तेव्हा त्वचा फुगते आणि खाली लटकते. डोळ्यांच्या खाली सूज आल्यासारखी दिसते, पण प्रत्यक्षात त्याला अंडरआईज बॅग्स म्हणतात. डोळ्यांभोवती स्नायू आणि त्वचेच्या पेशींमध्ये कमी किंवा जास्त लवचिकतेमुळे हा त्रास उद्भवू शकतो. अनेकदा अति ताण किंवा पाणी दीर्घकाळ कमी प्यायलं गेल्यामुळे डिहायड्रेशन होऊन देखील ही समस्या उदभवू शकते. अति जागरण हे देखील ह्याच महत्वाचं कारण आहे.
ह्यासाठी अनेक उपाय आहेत. पण ताणाचं योग्य व्यवस्थापन आणि अर्थात पुरेशी झोप घेणं आणि शरीराला आवश्यक तितकं, ऋतूनुसार पाणी पिणं हे सगळ्यात महत्वाचे उपाय आहेत.
आता आपण काही सोपे उपाय ज्याने हा त्रास तुम्ही कमी करू शकता त्याबद्दल बोलूया
१) टी-बॅग
यासाठी तुम्ही ग्रीन आणि ब्लॅक चहाच्या दोन्ही बॅग वापरू शकता. सर्वप्रथम गरम पाणी बनवा आणि त्यात दोन टी बॅग टाका. त्यानंतर त्यांना एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यांना थोडे थंड होऊ द्या. या बॅगने तुमचे डोळ्यांना शेक द्या. त्यांना १५ सेकंदांसाठी डोळ्यांवर ठेवा. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवून कोल्ड कॉम्प्रेस देखील करू शकता. काही काळानंतर सूज कमी होण्यास सुरुवात होईल.
२) डोळ्याच्या खाली झोपताना हलक्या हाताने खोबरेल तेल किंवा इतर कोणतंही चांगल्या दर्जाचं मसाज तेल लावा. अर्थात हे करताना आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मगच डोळ्यांना हे तेल लावा. हे तेल डोळ्यात जाणार नाही आणि जे तेल डोळ्यांच्या खाली लावणार आहात, त्याची तुम्हाला ऍलर्जी नाही ना ह्याची खात्री करून घ्या.
३) थंड चमचा
डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी तुम्ही चमचा एक प्रयोग करू शकता. यासाठी ४ ते ५ चमचे घ्या आणि काही तास फ्रीजमध्ये ठेवा. आता हे थंड चमचे फ्रीज मधून काढून बंद डोळ्यांवर ठेवा. याने तुम्हाला खूप विश्रांती मिळेल.
४) अनेकदा सतत साठलेली सर्दी हे पण आयबॅग्सचं कारण असू शकतं, त्यामुळे जर सतत सर्दी होऊन, ती जर साचून रहात असेल तर तज्ज्ञ डॉक्टर्सच्या सल्ल्ला जरूर घ्या
५) आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या ६०% वजन हे पाण्याचं असतं, त्यामुळे पाण्याचं शरीरातील प्रमाण कमी झालं तर त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो आणि आयबॅग्स येऊ शकतात.
६) कडक उन्हात सातत्याने फिरल्यामुळे देखील डोळ्यांच्या खाली आयबॅग्स येऊ शकतात, त्यामुळे उन्हाळ्यात सनस्क्रीन लोशन जरूर वापरा आणि त्यातल्या त्यात डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने लोशन लावा. फक्त हे लोशन डोळ्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्या.
७) अनेकदा झोपताना मेकअप पूर्णपणे न काढल्यामुळे देखील डोळ्यांखाली घट्ट बॅग्स तयार होऊ शकतात. त्यामुळे रात्री कितीही उशीर झाला किंवा थकवा आला तरी मेकअप स्वच्छ करून काढण्याची सवय लावून घ्या.
८) पुरेशी झोप ही शरीराच्या आणि अर्थात डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जागरण टाळणं शक्य असेल तर रात्री वेळेत झोपा आणि कमीत कमी ८ तास तरी झोप घ्याल हे जरूर पहा.
९) जसं वय वाढत जातं तसं डोळ्यांचे मसल्स आणि मांसपेशी कमकुवत होऊ लागतात. ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर सी व्हिटॅमिन देणारे अन्नपदार्थ आहारात समाविष्ट असायला हवेत. संत्री किंवा लिंबू वर्गातील फळं ह्यांचा आहारात समावेश हवा. तसंच द्राक्षात अँटी एजिंग क्षमता अधिक असल्यामुळे द्राक्षांचा देखील आहारात अधिक समावेश करावा.
१०) दारू किंवा सिगारेटचं अतिसेवन हे शरीराला हानीकरक आहेच पण ते ते शरीरातील पाण्याचं प्रमाण देखील कमी करतं आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या डोळ्याखालची नाजूक त्वचा ताणली जाऊन आयबॅग्स तयार होण्यावर होऊ शकतो.
बहुतांश वेळेस डोळ्यांच्या खाली येणारी सूज किंवा आयबॅग्स ह्या घरगुती उपायांमुळे किंवा लाइफस्टाइलमधील बदलांमुळे दूर होतात, पण तरीही जर हा त्रास कमी झाला नाही तर मात्र नेत्रतज्ज्ञांची जरूर भेट घ्या.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6