
रजोनिवृत्तीचा डोळ्यांवर होणारा परिणाम – मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अपरिहार्य आणि काहीसा त्रासाचा टप्पा . रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात आणि त्याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो तसा तो डोळ्यांवर देखील होतो. पण वयाच्या या टप्प्यावर स्त्रिया या त्रासांकडे दुर्लक्ष करतात, मुख्यतः डोळ्यांच्या त्रासांकडे तर, ‘या वयात हे त्रास होणारच’, असं मानून साफ दुर्लक्ष करतात आणि त्यातून पुढे अनेक समस्या गंभीर होऊ शकतात.
रजोनिवृत्तीच्या काळात हॉर्मोनल बदलांमुळे एकूणच शरीरात कोरडेपणा येतो आणि तो डोळ्यांमध्ये देखील येतो.
यामुळे खालील त्रास सुरु होतात.
१) डोळे कोरडे पडल्यामुळे डोळ्यांची जळजळ
२) कमी दिसणं किंवा किंचित अडनहुक दिसणं
३) डोळ्यात काहीतरी अडकलं आहे असं वाटून डोळ्यांना खाज येणे
४) डोळ्यांना प्रकाश सहन न होणे
ही अशी लक्षणे आढळली तर त्याच्याकडे स्त्रियांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. या काळात अनेक स्त्रियांच्या बाबतीत अश्रुपिंडातून पुरेसे अश्रू बाहेर न येणं किंवा कधीकधी अश्रुपिंड कामच न करणे हे देखील आढळलं आहे. अशावेळेस डोळ्यांच्या डॉक्टरना भेटा, त्यांच्याकडून डोळे तपासून घेऊन, डोळ्यांचा कोरडेपणा घालवण्यासाठी डोळ्यात घालण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेली औषधं न चुकता डोळ्यात घाला, जेणेकरून डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल.
या शिवाय डोळ्यांचा कोरडेपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय नक्की करा.
१) डोळे नियमितपणे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवा
२) डोळ्यांवर थंड पाण्याच्या किंवा दुधाच्या घड्या ठेवा
३) आहारात ओमेगा ३, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन अ यांचा आहारात पुरेसा समावेश करा.
याशिवाय रजोनिवृत्तीच्या काळात अनेक स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास देखील सुरु होतो. या बाबतीत मात्र अधिक काळजी घ्या. चक्कर येणं, डोकं दुखणं, धाप लागणं यापैकी कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरित तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन रक्तदाब तपासून घ्या. कारण उच्च रक्तदाबावर जर वेळीच उपाय नाही केले तर तो डोळ्यांना घातक ठरू शकतो.
याच काळात मोतीबिंदू, काचबिंदू सारखे डोळ्यांचे आजार सुरु होऊ शकतात. त्यामुळे दर ६ महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करून घेणे हे आवश्यकच आहे.
रजोनिवृत्तीचा काळ स्त्रियांसाठी जरी त्रासाचा असला तरी वर सांगितलेली काळजी घेतली तर त्यांची दृष्टी ही कायम उत्तम राहू शकेल हे नक्की.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6