Marathi

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात

सध्याच्या कम्प्युटर युगात ऑफिसमध्ये सलग १०,१२ तास कम्प्युटरसमोर बसून काम करणं, मग घरी आल्यावर पुन्हा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसणं आणि उशिरा झोपणं आणि सकाळी पुरेशी झोप झालेली नसताना पुन्हा कामावर जाणं, ह्यामुळे शरीरावर ताण येतोच, पण डोळ्यांवर देखील खूप ताण येतो. मग हळूहळू डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसायला लागतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मेकअपद्वारे ती […]

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात Read More »

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर

चष्मा वापरायला आवडत नाही म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचं मुख्य कारण हे एकतर चष्मा वापरायचा कंटाळा किंवा त्रास हे असतं, किंवा चष्मा वापरायची काहीशी लाज वाटणे हे असतं. कॉन्टॅक्ट लेन्सेस हा या सगळ्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही

कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर Read More »

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, कारण एकतर रखरखीत उन्हापासून सुटका मिळालेली असते, त्यात पुन्हा सर्वत्र हिरवंगार झालं असल्यामुळे पिकनिकला जाण्याचा मूड बनत असतो. पण या सगळ्यात पाऊस हा अनेक आजारांना सुद्धा घेऊन येत असतो, आणि त्यांची योग्य काळजी नाही घेतली तर हे आजार त्रासदायक ठरू शकतात. पण आज आपण पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार होऊ शकतात

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

मागच्या २ लेखांमध्ये आपण वैमानिक आणि सैन्य/नौदल यांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची दृष्टी कशी असावी आणि मुख्यतः वैमानिकांना डोळ्यांच्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याबद्दल चर्चा केली. या लेखामध्ये आपण जर तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये शेफ होऊ इच्छिता त्यांना काय डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत.

आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी Read More »

ब्लू लाईट चे डोळ्यांवर परिणाम

डोळा हा शरीरातील संवेदनशील अवयव आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कोव्हिडनंतर घराघरांमध्ये लॅपटॉप, टीव्हीचे एलईडी स्क्रीन्स आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटातील लोकांचं खूपच वाढलं आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांची शाळाच कम्प्युटर स्क्रीनवर भरत होती त्यामुळे तर ह्या मुलांचा स्क्रीनसमोरचा काळ हा चिंता करण्याइतका वाढला आहे. त्यात मोठ्या वयाच्या

ब्लू लाईट चे डोळ्यांवर परिणाम Read More »

बिंज वॉच

बिंज वॉच’ ह्या शब्दाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? नाही ? कदाचित तुम्ही ह्या शब्दाबद्दल ऐकलं नसेल पण ही शक्यता खूप मोठी आहे की तुम्ही स्वतः, ‘बिंज वॉच’ केलं असेल. बरं तुम्हाला ह्या शब्दाचा अगदी डिक्शनरी मधला अर्थ समजवून सांगण्यापेक्षा ‘बिंज वॉच’ म्हणजे नक्की काय हे सांगतो. एखाद्या ओटीटीवर, एखाद्या तुमच्या आवडत्या सिरीजचा नवीन सिझन

बिंज वॉच Read More »

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य हा अगदी सर्रास नाही तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये आढळणारा डोळ्याचा आजार आहे. इंडियन ऑप्थलमॉलॉजी असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार भारतात १०० लोकांमागे ३० लोकांना हा त्रास आहे. जगातील अनेक देशांमध्ये देखील प्रमाण हे इतकंच आहे. फक्त हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार म्हणजे नक्की काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावरचे उपाय

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य Read More »

आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी

मागच्या लेखात आपण. वैमानिक होण्यासाठी तुमच्या दृष्टीची क्षमता कशी असावी लागते आणि त्यासाठीचे काय निकष पाळले जातात याबद्दल बोललो. या लेखात आपण सैन्यदलात आणि नौदलात जाण्यासाठी काय निकष तपासले जातात हे पाहूया. सर्वप्रथम सैन्यदलात जाण्यासाठी काय दृष्टीचे काय निकष बघितले जातात. १) सैन्यदलात भरती होणाऱ्यांची दूरची नजर किंवा दूरच दिसण्याची क्षमता ही उत्तम असावी लागते.

आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी Read More »

दारूचे डोळ्यावर होणारे परिणाम

मला अगदी नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो, ‘डॉक्टर दारूचा डोळ्यावर काही परिणाम होतो का ?’. मी हो असं उत्तर दिलं की रुग्ण थोडंसं अविश्वासाने माझ्याकडे बघतो. पण मी त्यांना जेंव्हा ठामपणाने सांगतो की कुठलीही सवय तिचा अतिरेक झाला, मग ते दारू पिणं का असेना त्याचा डोळ्यावर परिणाम होणारच. मी ह्या आधीच्या लेखांमध्ये एक गोष्ट वारंवार

दारूचे डोळ्यावर होणारे परिणाम Read More »

चाळिशीनंतर डोळ्यांची काळजी कशी घ्याल

चाळिशीनंतर डोळ्यांची काळजी कशी घ्याल – काही दशकांपूर्वी चाळीशीचा चष्मा ही खूपच कॉमन गोष्ट होती. पण त्या आधी सहसा चष्मा लागत नसे. पण आता मात्र दहाव्या वर्षीच चष्मा लागण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. आणि चाळिशीच्या आधीच चष्मा असणाऱ्यांचं प्रमाण देखील वाढत आहे. आज माणसाचं सर्वसाधारण आयुर्मान हे वाढलं आहे त्यामुळे चाळीशी हा आयुष्याचा मधला टप्पा

चाळिशीनंतर डोळ्यांची काळजी कशी घ्याल Read More »

Venue | harborside chapel. : dental implants offer a long term solution for missing teeth, potentially lasting a lifetime with proper care.