उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो
Eyecare in High Blood Pressure

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो – ध्याचं आयुष्य हे धकाधकीचं आणि तणावांनी भरलेलं आहे. अगदी तिशीतल्या तरुण तरुणींना देखील उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाल्याचं आढळतं. आणि बैठी जीवनशैली, चुकीचा आहार ह्यामुळे वयाच्या पन्नाशीच्या पुढे उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याची उदाहरणं ही अगदी सर्रास दिसतात. थोडक्यात उच्च रक्तदाबाने मानवी शरीरावर आक्रमण केल्याचं आढळतंय.

उच्च रक्तदाबाचा फटका हा डोळ्यांना निश्चित बसू शकतो म्हणून उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी नक्की काय आणि कशी काळजी घ्यावी या विषयावर आपण आजच्या लेखात बोलणार आहोत.

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यातील रेटिनातील पेशींना फटका बसण्याची दाट शक्यता असते. ह्यामुळे डोळ्यांना जाणवणारा प्रकाश आणि एखाद्या वस्तूची पडणारी प्रतिमा ही कमी दिसायला लागते.

उच्च रक्तदाबाचा त्रास हा जर दीर्घकाळ दुर्लक्षित केला तर हा त्रास नक्कीच होऊ शकतो, ह्यासाठी मुळातच जर तुमची जीवनशैली बैठी असेल, तुमचा आहार, झोप हे योग्य वेळेत होत नसेल आणि तुम्हाला सतत थकल्यासारखं वाटतंय किंवा डोकं दुखतंय किंवा गरगरतय असं वाटलं तर तात्काळ तुमच्या डॉक्टरकडे जाऊन रक्तदाब तपासून घेत जा. तुम्ही जर वयाची चाळीशी पार केली असेल तर मात्र शक्यतो महिन्यातून एकदा रक्तदाब तपासून घेत जा.

उच्च रक्तदाबामुळे डोळ्याला नक्की काय हानी पोहचू शकते?

१) डोळ्यातील नसांना पुरेसा रक्तपुरवठा न होणे

२) डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणं

३) डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणं


उच्च रक्तदाबाने डोळ्याला झालेली इजा आणि त्याची लक्षणे

१) डोळ्यांना दुहेरी दृष्टी येणं

२) डोळ्यांना अंधुक दिसणं

३) काही काळ अचानक दिसेनासं होणं

४) डोकं दुखणं

ह्या पैकी काहीही लक्षण आढळल्यास डोळ्याच्या डॉक्टरकडे आणि तुमच्या नेहमीच्या डॉक्टरकडे तात्काळ धाव घ्या. ह्या पैकी लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कधीकधी रुग्णाच्या डोळ्याच्या पडद्याच्या भागाला सूज येणं, तिथे रक्तस्त्राव होणं असं घडलेलं देखील आढळलं आहे.

ह्यासाठी उपाय काय ?
मुळात उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ नये ह्यासाठी जीवनशैली नीट करणं आवश्यक आहे.

१) रोज किमान ३० मिनिटं झेपेल असा व्यायाम करावा.

२) किमान ७ तासांची शांत झोप घ्यावी

३) सकस, कमी तेलात बनलेला आहार घ्यावा

४) मानसिक ताणाला हाताळण्यासाठी रोज ध्यान करावं अथवा एखादा छंद जोपासावा.

५) आणि इतकं करून देखील उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झालाच आणि डॉक्टरने एखादी गोळी सुचवल्यास ती गोळी नियमितपणे न चुकता घ्यावी

हे केलं तर उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील किंवा हा त्रासच होणार नाही आणि मग तुमचं आयुष्य पण आनंदी राहील आणि डोळे देखील उत्तम राहतील.

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

All from a modern mobile app powered by the zodiac tv global. अब आप तैयार हैं अपने बच्चे को educate करने के लिए ! आज ही शुरुआत करें।. Whatsapp stock market scam jawan times.