
ओक्यूलर अल्बिनिझम वर उपाय काय – तुम्ही अनेकदा अशा लोकांना बघितलं असेल ज्यांचे डोळ्यांच्या सतत हालचाली सुरु होतात, किंवा असं म्हणूया की डोळे स्थिर राहत नाहीत, अशा लोकांचे केस हे तपकिरी असतात आणि त्यांची त्वचा अगदी पांढुरकी असते. हा एक प्रकारचा आजार आहे ह्याला अल्बिनिझम म्हणतात. हा आजार डोळ्यात, केस आणि त्वचेत पिगमेंट मेलॅनिनचं प्रमाण कमी असणं हे आहे. हा आजार अनुवांशिक आहे. ह्यात डोळ्यांविषयी होणाऱ्या आजाराला ocular albinism म्हणतात. ह्या आजारात डोळ्यांच्या बुबुळातील पिगमेंटेशन कमी असतं, थोडक्यात डोळ्याचा पडदा आणि बुबुळ ह्यातील डोळ्याचा जो रंगाचा भाग असतो ज्यामुळे माणसाची दृष्टी नॉर्मल होते, त्या भागातील पिगमेंटेशन कमी असतं. ह्यामुळे रुग्णाची नजर स्थिर राहत नाही, त्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही, दोन्ही डोळे एकाच ठिकाणी बघू शकत नाहीत.
ocular albinism असणाऱ्या सगळ्याच रुग्णांचे केस किंवा त्वचेतील मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं नाही, पण त्यांची त्वचा इतरांपेक्षा जास्त पांढुरकी असते.
पुरुषांमध्ये ह्या आजराच प्रमाण ६०,००० पुरुषांमध्ये एक असतं, ह्याचं स्त्रियांमधील प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं असं आढळलं आहे.
हा आजार अनुवांशिक असल्यामुळे मुलं तो जन्मतःच घेऊन येतात. त्यामुळे आपल्या बाळाचे केस, त्वचा ह्याचा रंग घरातील इतर लोकांपेक्षा हा जर वेगळा आणि फिकट असेल आणि घरात कोणाचीही निळ्या डोळ्यांची पार्श्वभूमी नसताना जर डोळे निळसर दिसत असतील तर त्या बाळाचे डोळे लहानपणीच डोळ्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून घ्या.
हा आजार आहे असं निदान झालं तर लहान वयातच डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या मुलाला/मुलीला योग्य चष्मा लावायची सवय लावा. जसं ह्या मुलांचं शाळेत जायचं वय सुरु होईल तसं शाळेच्या मॅनेजमेंटला मुलाच्या आजराची माहिती द्या, जेणेकरून त्यांना वर्गात फळ्याच्या जवळचा बेंच मिळेल. तसंच शाळेतील नोट्सपासून इतर सगळं मटेरिअल हे मोठ्या फॉन्ट किंवा अक्षरांमध्ये शाळेकडून घ्यावं. मुलांना चष्म्याची सवय करावी आणि त्यांचे डोळे सातत्याने तपासून घ्यावेत.
कधी कधी अल्बिनिझममुळे डोळ्यात तिरळेपणा येऊ शकतो, अशावेळेस सर्जरी करून तो तिरळेपणा कमी करणं शक्य आहे पण अन्यथा हा आजार अनुवांशिक असल्यामुळे ह्यावर विशेष उपचार नाहीत. हा आजार मुलांच्या लहान वयातच निदान झाला तर उत्तम आणि त्यासाठी लहानपणापासूनच आपल्या मुला-मुलींचे डोळे डोळ्यांच्या डॉक्टरकडून तपासून घ्यावेत. ह्या रुग्णांना स्किनचा कॅन्सर होण्याचे चान्सेस देखील अधिक असतात त्यामुळे स्किन डॉक्टर्सकडून ह्यांच्या स्किनची तपासणी देखील नियमित करून घेत रहा. थोडक्यात ह्या आजारात डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे हाच एकमेव उपाय आहे
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6