लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा - काही दिवसांपूर्वी गणपती उत्सव संपला. त्याच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट डोळ्यात जाऊन काही तरुणांनी दृष्टी गमावल्याच्या केसेस समोर आल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी देखील. आता पुन्हा एकदा नवरात्रीचा उत्सव सुरु होऊन परत त्याच्या मिरवणुका आणि त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी न्यूइयरच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांमध्ये देखील हल्ली लेझर लाईटचा वापर सर्रास …

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा
#image_title

लेझर लाईट आणि डोळ्यांची इजा – काही दिवसांपूर्वी गणपती उत्सव संपला. त्याच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट डोळ्यात जाऊन काही तरुणांनी दृष्टी गमावल्याच्या केसेस समोर आल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी देखील. आता पुन्हा एकदा नवरात्रीचा उत्सव सुरु होऊन परत त्याच्या मिरवणुका आणि त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी न्यूइयरच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांमध्ये देखील हल्ली लेझर लाईटचा वापर सर्रास होतो. अशावेळेला ह्या लेझर लाईट सलग खूप काळ डोळ्यांनी पाहिला तर नक्की डोळ्यावर काय परिणाम होतो ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. अमेरिकन अॅकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी’च्या अहवालानुसार पाच मिलिवॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या ‘लेझर लाइट’मुळे नेत्रपटल खराब होण्याची शक्यता असते.


लेझर लाईटकडे खूप वेळ पाहिल्याने कोणाच्या नेत्रपटलावर किंवा कोणाच्या बुबुळावर परिणाम होतो. काही ठिकाणी तर बुब्बुळावर इजा होऊन रक्त्तस्त्राव झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. लेझर लाइटकडे एकटक पाहिले की लेझर लाइटचे किरण त्याच्या नेत्रपटलाच्या मध्यभागी पडल्याने उष्णता तयार होऊन पडद्याला जखम करू शकतात. नेत्रपटलाच्या खाली रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यांना इजा पोहोचल्याने नेत्रपटलाखाली रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो.  रक्तस्त्राव झाल्याने वाचनशक्ती आणि डोळ्यांची क्षमताही कमी होऊ शकते. आणि ह्यातील सर्वात दुःखद भाग म्हणजे एकदा का दृष्टी कमी झाली की ती पूर्ववत होईल ह्याची खात्री देता येत नाही.


मुळात लेझर लाईट असो की कम्प्युटर किंवा मोबाईल किंवा तत्सम कुठल्याही वस्तूकडे पाहताना त्यातील निळा प्रकाश तुमच्या डोळ्यात शिरतच असतो. तो प्रकाश शिरायला लागला की कधीतरी डोळ्यावर अतिरिक्त ताण येऊन डोळे दुखायला लागणे, अचानक अंधुक दिसायला लागणे किंवा डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणं जाणवू लागतात. असं जाणवायला लागलं तर चटकन डोळे मिटून घ्यावेत आणि त्या जागेपासून दूर जायला हवं.

लेझर लाईट डोळ्यात गेला तर वर म्हणल्याप्रमाणे बुबुळावर पण परिणाम होऊ शकतो आणि रेटिनावरपण. समजा बुबुळावर परिणाम झाला तर बुबुळावर उपचार शक्य आहेत पण रेटिनावर परिणाम झाला तर त्यावर उपाय शक्य नाही.


ह्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कुठल्याही वयातील व्यक्ती मग अगदी लहान वयाच्या व्यक्तीपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही लेझर लाईट तीव्र असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं. अगदी जायची वेळ आली तर त्या लाईटकडे टक लावून अजिबात बघू नये. आणि शक्यतो सूर्यग्रहणाच्या दरम्यान जे गॉगल्स वापरले जातात ज्यात ब्लॅक पॉलिमर किंवा सिल्व्हर मायलर वापरलं जातं तसेच गॉगल्स वापरावेत.  

आणि समजा तरीही डोळ्यात लेझर जाऊन डोळ्यातून पाणी येत आहे किंवा डोके दुखायला लागले आहे किंवा डोळे दुखत आहेत किंवा डोळ्यावर ताण आलाय असं वाटायला लागलं तर मात्र तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरची भेट घ्यावी. कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. कारण जर कोणीतही गंभीर इजा झाली असेल तर त्यावर जितक्या लवकर उपाय करता येतील तितक्या लवकर ते झालेले उत्तम अन्यथा डोळा कायमचा अधू होण्याची शक्यता अधिक आहे.

उत्सवाचा आनंद जरूर घ्यावा पण त्याने डोळ्यांना किंवा कुठल्याही अवयवाला कायमची इजा होईल असं काही करू नये.  

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Book a Consultation

It’s easy and free!
admin

admin

Ford transit remapping mobile service. Firstly, boris is a super awesome doberman.