सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास

सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास
Eyecare for Labours

सुतार किंवा वेल्डर यांना होणारा डोळ्याचा त्रास – मागच्या लेखात आपण बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना डोळ्यांच्या कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यावरचे उपाय याबद्दल बोललो होतो. या लेखात आपण अजून एका वेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत, ते म्हणजे वेल्डिंग किंवा सुतारकाम (कारपेंटिंग) क्षेत्रांत काम करणारी लोकांच्यात उद्भवू शकणाऱ्या डोळ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय

सुतारकाम असो की वेल्डिंगची कामं करणारी लोकं असोत यांच्या डोळ्यांना सातत्याने तीव्र उजेड, कामाच्या ठिकाणी उडणारे छोटे कण यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे या क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी डोळ्यांची अधिकच काळजी घ्यावी.

वेल्डिंग :- वेल्डिंगच्या ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण होत असते आणि डोळ्यांना प्रखर प्रकाशाचा सामना देखील करावा लागतो आणि ज्याच्यामुळे डोळ्यांना वेगवेगळ्या दुखापती होऊ शकतात. वेल्डिंग करणाऱ्यांच्या बाबतीत डोळ्यांना वेल्डिंगच्या दरम्यान निघणाऱ्या ठिणग्या (इंग्रजीत याला वेल्डर फ्लॅश म्हणतात), इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांनी डोळ्यांना होणारा संसर्ग, डोळ्यात कण उडून जाऊन होणारी दुखापत, यासारख्या इजा होऊ शकतात. डोळे सातत्याने लाल होणे, त्यातून पाणी येणं, डोळे सुजणे, आणि डोळ्यांना प्रकाश सहन न होणे यासारखी लक्षणं आढळतात. आणि डोळ्यांवर जर योग्य ते आवरण न घालता कामं केली तर डोळ्याच्या पडद्याला आणि बुबुळांना कायमची दुखापत होऊ शकते.


सुतारकाम किंवा लाकूडकाम :- लाकडाचे बारीक तुकडे, कण, लाकडाचा भुगा, डोळ्यात जाऊन डोळ्यांना दुखापत होणे हे कायम आढळतं. सुतारकाम करणारे हे ड्रिलिंग किंवा करवतीने लाकूड कापण्याची कामं कायम करत असतात, यांत डोळ्यात बारीक तुकडे उडून जाणे किंवा एखादा तुकडा जोरात डोळ्यावर येऊन आपटणे हे प्रकार घडत असतात. डोळ्यांना एखादी वस्तू आपटून जखम होणे हा प्रकार पण खूप सर्रास आढळतो. काहीवेळेला सातत्याने या धूलिकणांच्यात काम केल्याने डोळ्याला इन्फेक्शन होण्याचा धोका देखील अधिक असतो. सुतारकाम करताना सुतार अनेकदा विविध प्रकारची केमिकल्स, किंवा वस्तू चिकटवण्यासाठी काही अधेसिव्हचा वापर करतात. यामुळे डोळ्यांची जळजळ होण्याची शक्यता असते.


उपाय


तुमचं काम वेल्डींगशी संबंधित असेल तर मात्र डोळ्यावर वेल्डिंगला पूरक असा गॉगल नक्की घाला. त्याशिवाय चुकून पण काम करू नका.

वेल्डिंगच्या कामात प्रचंड उष्णता निर्माण होते त्यामुळे दर काहीवेळाने कामातून सुट्टी घ्या आणि त्यादरम्यान डोळ्यांवर थंड पाणी मारा किंवा किमान डोळे बंद करून बसा.

तुम्ही वेल्डिंगचं काम करत असाल तर तुमचं डोळ्यांचं आणि चेहऱ्याचं संरक्षण करणारं युनिट हे अल्ट्राव्हयोलेट किरणांपासून डोळे सुरक्षित ठेवू शकतो का हे तपासून घ्या. आणि नसल्यास ते जरूर मागून घ्या.

सुतारकाम आणि लाकूडकाम करणाऱ्यांनी त्यांची जागा सतत स्वच्छ करा. तिथे जमा होणारा कचरा डोळ्याला घातक असू शकतो याचं भान जाऊ देऊ नका.

वेल्डिंगच्या ठिकाणी किंवा कोणत्याही मशीनवर काम करताना कोणती खबरदारी घ्यावी याचं सूचना पुस्तक आधी वाचून घ्या जेणेकरून कोणतीच दुखापत होणार नाही.

समजा डोळ्याला दुखापत झालीच तर थंड पाण्याने डोळे धुवून काही काळ डोळे मिटून बसा, पण जर डोळ्याची लाली कमी होत नाहीये किंवा डोळ्यातून रक्त येत आहे असं जाणवलं तर मात्र डोळ्याच्या डॉक्टरकडे लगेच धाव घ्या.

वेल्डिंग करणाऱ्यांनी डोळे थंड राहतील हे पाहण्यासाठी डोळ्यावर रोज संध्याकाळी थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात आणि कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या उष्णतेचा परिणाम शरीरातील उष्णता वाढण्यावर पण होऊ शकतो यामुळे भरपूर पाणी प्या.

आपल्या कामाचं स्वरूप लक्षात घेऊन जर तुम्ही डोळ्यांची काळजी घेतलीत तर तुमचे डोळे खराब होणार नाहीत, त्यांचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे वरील सर्व सूचनांचा जरूर विचार करा. 

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

About us | family run bathroom specialists northwich sensational bathrooms. Stonebridge country club naples fl.