
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी – आजच्या लेखात आपण मेडिकल क्षेत्रांत काम करणारे मग ते डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय म्हणून किंवा पॅथॉलॉजी लॅब्समध्ये काम करणारे, यांनी स्वतःच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा करणार आहोत. मुळात आरोग्य क्षेत्रातील लोकांचेच स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते आणि त्यात पुन्हा डोळ्यांच्या समस्या जर किरकोळ स्वरूपातील असतील तर त्यांच्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष होते. पण आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्यांच्या डोळ्यांवर कळत-नकळतपणे ताण येत असतो आणि त्यांचं कामाचं स्वरूप हे इतरांच्या आयुष्याशी संबंधित असल्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी
१) डोळ्यांची नियमित तपासणी :- आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी न चुकता दर ६ महिन्यांनी डोळ्यांची तपासणी डोळ्यांच्या डॉक्टरकडून करून घ्यावी. अनेकदा डोळ्यांना आलेला ताण किंवा डोळे कोरडे पडले याची तात्कालिक कारणे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण याची कारणे ही तात्कालिक नसून मोतीबिंदू किंवा डोळ्यांची क्षमता कमी होत जाणे हे देखील असू शकते. मुळात खूप तास सतत डोळ्यांना ताण येण्याची कामं असलेल्या सर्जिकल विभागातील आरोग्यसेवकांनी तर निश्चित डोळ्यांची तपासणी नियमित करून घ्यावी.
२) पुरेसा प्रकाश :- तुम्ही जिथे काम करताय मग ते क्लिनिक असो किंवा वॉर्ड असो की पॅथॉलॉजी लॅब असो तिकडे पुरेसा प्रकाश आहे ना हे जरूर बघा, आणि जर प्रकाश पुरेसा नसेल तर तशी व्यवस्था करून घ्या. कारण सातत्याने कमी प्रकाशात काम केल्याने डोळ्यांवर खूप ताण येऊ शकतो.
३) हातांची स्वच्छता :- मेडिकल क्षेत्रांत काम करणाऱ्यांना जंतुसंसर्ग होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे तुम्ही हात सतत धुवा. कामाच्या ठिकाणी रुग्णांची काळजी घेताना किंवा पॅथालॉजीमध्ये सॅम्पल चेक करताना हात चुकून डोळ्याकडे जाऊ शकतो. अशावेळेस सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे हात धुणे.
४) डोळ्यांना संरक्षण देणारे गॉगल्स :- तुम्ही सर्जरी करत असताना किंवा पॅथालॉजीमध्ये काम करत असताना डोळ्यांवर न विसरता त्या त्या कामासाठी असलेले संरक्षणात्मक गॉगल्स जरूर घाला. कारण एखादी वस्तू डोळ्यात उडून डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५) २०:२०:२० चा नियम वापरा :- खरंतर डोळ्यांवर ताण आणणाऱ्या सगळ्यांनी या नियमाचा अवलंब केला पाहिजे. जर २० मिनिटे सलग काम केलं तर किमान २० सेकंद तुमची नजर इतरत्र फिरवा आणि २० सेकंद डोळे मिटून घ्या. जेणेकरून डोळ्यावर आलेला ताण आपोआप कमी होईल.
६) जीवनशैली :- योग्य झोप, उत्तम आणि संतुलित आहार आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त डोळ्यावर ताण आणणारे स्क्रीन्स मग ते टीव्हीचे असू देत की मोबाईलचे यांचा कमीतकमी वापर करा. जीवनशैलीचे हे नियम पाळलेत तर शरीराचं आणि डोळ्यांचे आरोग्य नीट राहील.
डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/
कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6