पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल
Eyecare in Swimming

पोहताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल – उन्हाळा सुरु झाला की अनेकांना कधी एकदा स्विमिंग पूलमध्ये जातोय असे वेध लागतात. स्विमिंग पूलच्या थंडगार पाण्यात डुबकी मारायला अनेकांना आवडतं. स्विमिंग हा शरीराला मिळणारा उत्तम व्यायाम आहे, पण ह्या व्यायामप्रकाराकडे उन्हाळ्यात अधिक लोकं वळतात. अशावेळेस जशी स्किनची काळजी घेणं आवश्यक आहे, तशीच डोळ्यांची काळजी देखील घेणं आवश्यक आहे. जर डोळ्यांची नीट निगा राखत, पोहण्याच्या व्यायामाचा आनंद घेतला तर शरीर सुदृढ राहीलच पण डोळ्यांचं आरोग्य देखील उत्तम राहील.

म्हणून उन्हाळ्यात पोहायला जायचं असल्यास खालील टिप्स जरूर विचारात घ्या.


१) सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही ऋतूत तुम्ही पोहायला गेलात तरी डोळ्यावर गॉगल लावायला विसरू नका. पोहणाऱ्यांसाठी म्हणून बनलेले जे विशिष्ट गॉगल असतात त्याचा वापर हा आवश्यकच आहे.

२) तुम्ही ज्या स्विमिंग पूल मध्ये पोहत आहात, त्या स्विमिंगपूलमधल्या पाण्यातील क्लोरीनची पातळी लक्षात घ्या. जर त्यात क्लोरीनचं प्रमाण अधिक असेल तर पाण्याचा संपर्क डोळ्यांशी कमीतकमी येईल.

३) जे चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरत आहेत त्यांनी पोहताना डोळ्यातील कॉन्टॅक्ट लेन्सेस जरूर काढा. जर तुम्ही डोळ्यावर लेन्सेस लावून पाण्यात पोहण्यासाठी उतरलात तर लेन्सेस पाणी शोषून घेऊन डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

४) स्विमिंग पुलमधलं पाणी हे सातत्याने शुद्ध करण्याचे प्रयत्न सुरु असतात, पण तलाव, नदी, विहीर अशा ठिकाणी तुम्ही जर पोहायला जाणार असाल तर ते पाणी किती स्वच्छ आहे किंवा तिचा स्रोत प्रदूषित नाही ना ह्याची जरूर माहिती घ्या. ज्या पाण्याच्या साठ्याबद्दल तुम्हाला फारसं माहित नसेल अशा ठिकाणी पोहणं शक्य असल्यास टाळा.

५) पोहून झाल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने हळुवारपणे धुवा. ह्याने डोळ्यात गेलेला कचरा अथवा क्लोरीन आपोआप स्वच्छ होईल आणि त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य देखील नीट राहील.

६) जर तुमचे डोळे कोरडे पडत असतील आणि तुम्ही पोहायला जायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यात एखादं ल्युब्रिकंट औषध जरूर टाका जेणेकरून डोळ्याभोवती एक संरक्षणात्मक थर तयार होईल आणि पाण्यातील कोणतेही जंतू डोळ्यात जाऊन डोळ्यांची हानी करू शकणार नाहीत.

७) पाण्यातून पोहून बाहेर आल्यावर जर डोळ्यांची चुरचुर होत आहे असं वाटलं तर डोळे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवा, त्यानंतर त्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवा. आणि तरीही चुरचुर नाही थांबली तर मात्र डोळ्याच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.

८) पाण्यात पोहताना किंवा खेळताना, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची एक मजा असते पण हे करताना स्वतःच्या आणि इतरांच्या डोळ्यात पाणी जाऊन इजा होणार नाही, ह्याकडे मात्र जरूर लक्ष द्या.

वर सांगितलेली काळजी घेतलीत, ह्या उन्हाळ्यात तुम्ही पोहण्याचा छान आनंद घेऊ शकाल. 

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Bathroom showroom northwich | design, supply & install sensational bathrooms. Royal wood golf and country club naples fl : homes for sale and real estate.