पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल - पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. प्रचंड उन्हाळ्यानंतर पावसाळ्याची आपण सगळे आवडीने वाट पाहत असतो. आणि इतकंच नाही तर पावसाळी पिकनिक्स, ट्रेकिंग इत्यादींचे प्लॅन्स पण सुरु असतात. पण ह्या सगळ्यात पावसाळ्यात आरोग्याकडे आणि विशेषकरून डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं असतं हे आपण विसरतो.पावसाळ्यात डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, ह्याच काळात …

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल
#image_title

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल – पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. प्रचंड उन्हाळ्यानंतर पावसाळ्याची आपण सगळे आवडीने वाट पाहत असतो. आणि इतकंच नाही तर पावसाळी पिकनिक्स, ट्रेकिंग इत्यादींचे प्लॅन्स पण सुरु असतात. पण ह्या सगळ्यात पावसाळ्यात आरोग्याकडे आणि विशेषकरून डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं असतं हे आपण विसरतो.


पावसाळ्यात डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, ह्याच काळात डोळे येण्याचं प्रमाण पण अधिक असतं. डोळ्यांना खाज येणे, डोळे लाल होणे ह्या समस्या अगदी नेहमी आढळून येतात.

पावसाळ्यात डोळ्यांसंबंधी काही काळजी जरूर घ्या


१) पावसाळ्यात डोळ्यामध्ये पावसाचं पाणी जाऊन डोळे लाल होणे किंवा चुरचुरणं ह्या गोष्टी होऊ शकतात. अशावेळेला डोळ्यात पावसाचं पाणी गेलं तर डोळे चोळू नका, ते घरी येऊन स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवा आणि मग कोरड्या फडक्याने हलक्या हाताने टिपून घ्या

२) पावसाळ्यात डोळ्यांचा मेकअप करून बाहेर पडणं शक्यतो टाळाच. कारण तुमचा मेकअप पावसाच्या पाण्यामुळे डोळ्यात जाण्याची शक्यता पण अधिक आहे

३) पावसाळ्यात तुमचा हात किंवा चेहरा पुसायचा टॉवेल हा स्वच्छ आणि कोरडा आहे ना हे जरूर पहा. कारण ओल्या टॉवेलमुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे

४) पावसाळ्यात अनेक लोकं पावसाळी पिकनिक म्हणून पाण्याच्या जागी पिकनिक्सना जातात. इथे तुम्ही ज्या पाण्यात उतरणार आहात त्या पाण्याची क्वालिटी कशी आहे, त्यात कुठले जंतू तर दिसत नाहीत ना हे बघा. आणि धबधब्याच्या खाली उभं राहताना डोळ्यावर पाण्याचा एकदम प्रवाह येणार नाही किंवा एखादी टोकदार वस्तू डोळ्याजवळ येणार नाही हे जरूर पहा.

५) जे लोकं कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात त्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणं शक्यतो टाळाच

६) पावसाळ्यात डोळे येण्याचं प्रमाण वाढतं. तुम्हाला डोळे आले आहेत असं जर जाणवलं तर तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार सुरु करा जेणेकरून तुमच्यामुळे कोणाला संसर्ग होणार नाही आणि त्याहून महत्वाचं म्हणजे डोळे आलेल्या व्यक्तीच्या जवळ जाणं किंवा त्याच्या वस्तू वापरणं टाळायला हवं.

७) सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यांच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. ते जर पावसात भिजून आले तर हलक्या हाताने त्यांचे डोळे स्वच्छ करा, त्यांना कुठल्याही साचलेल्या पाण्याच्या जागी जाऊ देऊ नका आणि त्यांना डोळ्यांचा कुठलाही त्रास सुरु झाला तर लगेच डॉक्टरला दाखवा.

ही काळजी घेतलीत पावसाळ्याचा छान आनंद घेणं सहज शक्य आहे. 

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Book a Consultation

It’s easy and free!
admin

admin

Investing in remapping services can significantly enhance your vehicle’s performance, whether it involves. भारत और नेपाल हाल ही में संस्कृत अनुसंधान और शिक्षा को बढ़ाने पर सहमत हुए।. Kelly is a curious, female doberman puppy making solid progress in potty training.