डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत - मागच्या एका लेखात आपण डोळ्यांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून कोणते पदार्थ आहारात असावेत ह्याबद्दल लिहिलं होतं. पण मुळात आपण जे पदार्थ खातो त्या आहारात नक्की कोणती पोषणमूल्य आहेत की ज्या पोषणमूल्यांच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं हे जर कळलं तर तो आहार अधिक काळजीपूर्वक घेतला जातो. मुळात डोळे हा आपल्या …

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत
#image_title

डोळ्यांकरिता उपयोगी पोषणमूल्ये कोणती आहेत – मागच्या एका लेखात आपण डोळ्यांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून कोणते पदार्थ आहारात असावेत ह्याबद्दल लिहिलं होतं. पण मुळात आपण जे पदार्थ खातो त्या आहारात नक्की कोणती पोषणमूल्य आहेत की ज्या पोषणमूल्यांच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं हे जर कळलं तर तो आहार अधिक काळजीपूर्वक घेतला जातो.


मुळात डोळे हा आपल्या पाच महत्वाच्या अवयवांपैकी एक महत्वाचा अवयव आहे. हल्ली इलेक्ट्रॉनिक वस्तू मग ते मोबाइल्सचा स्क्रीन असो की लॅपटॉपचा किंवा टीव्हीचा स्क्रीन बघणं असो त्याचा डोळ्यावर खूपच वाईट परिणाम होत असतो. पण ह्या गॅझेट्सना पर्याय देखील नाही त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य खराब होऊ द्यायच नसेल तर आहारात खालील पोषणमूल्यांचा समावेश असायलाच हवा.

जीवनसत्व ई :- जीवनसत्व ई च्या अभावाने अंधुक दिसणे, आंधळेपणा, मोतीबिंदू होऊ शकते. म्हणून आहारात जीवनसत्व ई असलेले पदार्थ खाणे चांगले. बदाम, अक्रोड, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया अळशीचे तेल, पालक, ब्रोकोली, ऑलिव्ह तेल या सर्वांमध्ये जीवनसत्व ई असते.

जीवनसत्व सी : जीवनसत्व सी एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे, त्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पुरेशा प्रमाणात जीवनसत्व जर आहारात असेल तर मोतीबिंदू होण्यापासून वाचता येऊ शकते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या खाद्य पदार्थांमध्ये ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, मिरे, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळे, आणि पेरू यांचा समावेश होतो. व्हिटॅमिन सी साठी अगदी लिंबू सरबत देखील तुम्ही घेऊ शकता.

ओमेगा-3 फॅटी अॅसिड :- ओमेगा ३ जर योग्य प्रमाणात घेतलं तर स्नायूंच आरोग्य चांगलं राहतं आणि डोळ्यांना येणाऱ्या कोरडेपणावर पण मात करता येते. डोळ्यांचे स्नायू म्हातारपणात कमजोर होत जातात, त्यासाठी आहारात ओमेगा ३ चं प्रमाण योग्य असेल तर डोळे खूप छान राहू शकतात. त्यात पुन्हा डोळ्यात पुरेसे अश्रू निर्माण न होणं किंवा डोळ्यात पुरेसा ओलावा निर्माण न होणं ही हल्ली वाढत चाललेली समस्या आहे त्यासाठी आहारात ओमेगा ३ असलेले पदार्थ अधिक असायला हवेत. मासे, टूना मासे, शेंगदाणे, अळशीचे तेल ह्यातून ओमेगा ३ मिळू शकतं.

जीवनसत्व ए :- हे फॅट मध्ये मिसळणार व्हिटॅमिन आहे. डोळ्यांचा पडदा बनवणाऱ्या रंगद्रव्यांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारं व्हिटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन ए. आंधळेपणाचे महत्वाचं कारण म्हणजे अ जीवनसत्वाचा अभाव. गाजर, बीट, रताळे, मटार, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, राजमा, अंडे, बिन्स यामध्ये जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात असते

व्हिटॅमिन डी :- डोळ्यांना कोरडेपणा, मोतीबिंदू तयार होणे आणि रेटिनल झीज होण्यापासून संरक्षण करते. अंड्यातील पिवळ बलक, गाईचे दूध, सोया दूध ह्यामध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण अधिक असतं.

व्हिटॅमिन बी १२ :- व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. दूध, अंडी, चिकन आणि फिश ह्यामध्ये व्हिटॅमिन १२ हे मोठ्या प्रमाणावर असते.  

डोळे हा शरीराचा अतिशय महत्वाचा अवयव आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी वर उल्लेखलेली व्हिटॅमिन्स आहारात जरूर घ्या. 

डोळ्यांच्या कोणत्याही समस्या अस्ल्यास पुडिल लिंक वर क्लिक करा – https://lasikvision.in/

कपूर नेत्र केंद्र चहा पत्ता https://maps.app.goo.gl/4aKNiWco7exBzCKb6

Book a Consultation

It’s easy and free!
admin

admin

Enter your last name. Male doberman puppy (knight) with cropped ears & docked tail.