LasikVision https://lasikvision.in Kapoor Eye Centre Sat, 06 Dec 2025 09:09:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9 https://i0.wp.com/lasikvision.in/wp-content/uploads/2022/09/cropped-logo_auto_x2.jpg?fit=32%2C32&ssl=1 LasikVision https://lasikvision.in 32 32 214689392 मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा? https://lasikvision.in/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%91%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2591%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a4 Sat, 06 Dec 2025 09:09:04 +0000 https://lasikvision.in/?p=1741 मागच्या एका लेखामध्ये आपण डोळ्यांसाठी पोषक आहार कोणता ह्याबद्दल बोललो होतो. तो आहार हा एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार कोणता हा विचार करून लिहिलेला लेख होता. पण हल्ली मोतीबिंदू हा डोळ्यांचा अगदी सर्रास आढळणारा आजार आहे. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन्सची सुविधा अगदीच सोपी झाल्यामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेण्याचं प्रमाण देखील चांगलंच वाढलं आहे. मागे आपण एका […]

The post मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा? first appeared on LasikVision.

]]>
#image_title

मागच्या एका लेखामध्ये आपण डोळ्यांसाठी पोषक आहार कोणता ह्याबद्दल बोललो होतो. तो आहार हा एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार कोणता हा विचार करून लिहिलेला लेख होता. पण हल्ली मोतीबिंदू हा डोळ्यांचा अगदी सर्रास आढळणारा आजार आहे. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशन्सची सुविधा अगदीच सोपी झाल्यामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घेण्याचं प्रमाण देखील चांगलंच वाढलं आहे. मागे आपण एका लेखात मोतीबिंदू ऑपरेशनबद्दल बोललो होतो पण हे ऑपरेशन झाल्यावर त्यातून लवकर डोळ्यांच आरोग्य झपाट्याने सुधारावे असं वाटत असेल तर त्याला पोषक आहाराची जोड पण द्यायला हरकत नाही. तर मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा?


• फायबर
आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यास आपल्याला आहारामध्ये फायबर समाविष्ट करणे खूपच महत्त्वाचे असते..आपल्याला जर डोळ्यांच्या ऑपरेशननंतरची रिकव्हरी उत्तम करायची असेल आहारात फायबरचा नक्की समावेश करा. फायबर हे मुख्यतः फळं, भाज्या आणि त्यात देखील पालेभाज्यांमध्ये आढळतं. त्यामुळे मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर आहारात फळं. पालेभाज्या मुबलक प्रमाणात घ्या.

• दुग्ध उत्पादने
दूध हे प्रथिन यांचे उत्तम स्रोत मानले जाते. दूध हे शस्त्रक्रिया नंतर खूपच चांगले असते. बऱ्याच लोकांना असे आढळून आले आहे की शस्त्रक्रियेनंतर दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही खूपच चांगल्या प्रकारे वाढत आहे. म्हणूनच आपलं जर मोतीबिंदू ऑपरेशन झाले असेल तर आपण दूध उत्पादने खाण्याचा नेहमी प्रयत्न करावा.


• जीवनसत्व सी
C जीवनसत्व एक चांगले अँटिऑक्सिडंट आहे. या जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे आरोग्य नियमित चांगले राहत असते.पुरेशा प्रमाणामध्ये हे जीवनसत्व जर आपल्या आहारामध्ये असेल तर मोतीबिंदू होण्यापासून देखील आपण वाचू शकतो. पण मोतीबिंदू होऊन त्याचं ऑपरेशन झालं असेल तर योग्य रिकव्हरीसाठी व्हिटॅमिन सी कधीही उत्तम. ‘व्हिटॅमिन सी’साठी आहारात मोड आलेली कडधान्य हिरव्या पालेभाज्या आंबट फळे आणि पेरू यांचा समावेश नक्की करा.

• ओमेगा थ्री फॅटी ऍसिड
आपण आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर डोळे कोरडे होणे यापासून आपली सुटका मिळत असते. तसेच डोळ्यांची हानी ही एक मोठी समस्या आहे त्यामुळे आपल्याला अंधुक देखील दिसू लागते.यामुळे आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचा समावेश करणे खूपच गरजेचे असते. हे आपल्याला मासे, शेंगदाणे,अक्रोड, जवस ह्यातून चांगल्या प्रकारे मिळत असते.

• फळे
ताजी फळे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. नेहमी आपण प्रक्रिया न केलेले फळे खाण्याचा प्रयत्न करावा. मोतीबिंदू ऑपरेशन झाल्यानंतर फळे आपण नक्की खावे. अर्थात फळं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

• जीवनसत्व अ
अ जीवनसत्व मेदा मध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. काही पदार्थांमध्ये हे जीवनसत्व नैसर्गिक रित्या आढळून येत असते.  अ व्हिटॅमिन डोळ्यांच्या आरोग्याला अतिशय आवश्यक असं जीवनसत्व आहे. गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, अंडे यामध्ये ए जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळत असते.

वर सांगितलेले पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकलात तर तुमचं डोळ्यांचं एकूणच आरोग्य चांगलं राहीलच पण त्याही पलीकडे मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळ्यांची रिकव्हरी उत्तम होईल. 

The post मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आहारात कशाचा समावेश असायला हवा? first appeared on LasikVision.

]]>
1741
मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ https://lasikvision.in/%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a5%87/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2581%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%25ac%25e0%25a5%2587%25e0%25a4%259f%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587 Sat, 06 Dec 2025 08:33:20 +0000 https://lasikvision.in/?p=1737 मधुमेह हा आजार आता जवळपास सगळ्यांना माहीत असलेला आजार झाला आहे आणि दुर्दैव असं की ह्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरच्या २०२३ च्या एका अभ्यासानुसार भारतात जवळपास १० करोड लोकं ही मधुमेहाने त्रस्त आहेत आणि ह्या आजाराचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. आज जगातील मधुमेह्ग्रस्त देशांमध्ये भारताचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.हा असा एक आजार आहे […]

The post मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ first appeared on LasikVision.

]]>

मधुमेह हा आजार आता जवळपास सगळ्यांना माहीत असलेला आजार झाला आहे आणि दुर्दैव असं की ह्या आजाराचं प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरच्या २०२३ च्या एका अभ्यासानुसार भारतात जवळपास १० करोड लोकं ही मधुमेहाने त्रस्त आहेत आणि ह्या आजाराचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे. आज जगातील मधुमेह्ग्रस्त देशांमध्ये भारताचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हा असा एक आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही, पण हा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. त्यात डोळे हा शरीराचा असा एक नाजूक अवयव आहे ज्यावर मधुमेहाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहामुळे डोळ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे अतिशय गंभीरपणे बघितलं पाहिजे.

मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’, मोतीबिंदू आणि ग्लुकोमा हे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. ह्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहील हे पाहणं अतिशय आवश्यक आहे.

मधुमेहींनी कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवं

१) कधीकधी मधुमेहींना काही दिवसांसाठी थोडंसं अंधुक दिसतं आणि पुन्हा त्यांची दृष्टी पूर्ववत होते. अशावेळेस हे अंधुक दिसणं तात्कालिक आहे असं समजून रुग्णांकडून दुर्लक्ष केलं जातं. ही चूक करू नका. अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डोळ्यांच्या डॉक्टरकडे धाव घ्या.

२) मधुमेहाच्या सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा डोळ्यांना इजा पोहचू शकते, त्यामुळे डोळ्यातून सतत पाणी येणे किंवा अंधुक दिसणं असं जाणवलं तरी तात्काळ डायबेटिसच्या चाचण्या करून घ्या आणि डोळ्यांच्या डॉक्टरना डोळे दाखवून घ्या कारण मधुमेहाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा डोळ्यांच्या पेशींची हानी होऊ शकते

३) वर म्हणल्याप्रमाणे मधुमेह हा ग्लुकोमाला कारणीभूत ठरू शकतो. अचानक दिसेनासं झालं किंवा डोळ्यांची दृष्टी अचानक खूप कमी झालं तर ह्याला कारणीभूत मधुमेह असू शकतो हे विसरू नका.

४) जर तुम्हाला लहान वयात मोतीबिंदू आला असेल तर तुम्हाला मधुमेहाची लागण झाली असण्याची शक्यता आहे, त्यावर वेळीच उपाय करा

५) मधुमेहींनी किंवा इतर कोणीही वयाच्या चाळिशीनंतर नियमितपणे रक्तातील साखरेचं प्रमाण दाखवण्याऱ्या चाचण्या करून घ्याव्यात आणि रक्तदाब देखील तपासून घेत रहावा.

६) जर डोळ्यात प्रकाश चमकून जातोय किंवा रंग दिसायला अडचण होत आहे असं जाणवलं तरी पण मधुमेहाची तपासणी करून घ्या

काय काळजी घ्या


मधुमेह हा गंभीर आजार आहे. तो होणारच नाही ह्याकडे लक्ष द्या. ह्यासाठी तुमची जीवनशैली पूर्णपणे सुधारा. नियमित ७,८ तासांची झोप, पुरेसा व्यायाम, जंकफूड न खाणं
आणि तणावमुक्त जगण्यासाठी प्रयत्नशील रहावं.


पण तरीही समजा हा आजार अनुवांशिक असेल तर तो अधिक बळावणार नाही ह्यासाठी प्रयत्न करावेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबेटीससाठी डॉक्टर्सने दिलेली औषधं नियमित घ्या, त्यात कधीही टाळाटाळ करू नका आणि दर ६ महिन्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन डोळे तपासून घ्या !

The post मधुमेहामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ first appeared on LasikVision.

]]>
1737
डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात https://lasikvision.in/%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b3/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ad%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b3 Sat, 06 Dec 2025 08:15:54 +0000 https://lasikvision.in/?p=1733 सध्याच्या कम्प्युटर युगात ऑफिसमध्ये सलग १०,१२ तास कम्प्युटरसमोर बसून काम करणं, मग घरी आल्यावर पुन्हा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसणं आणि उशिरा झोपणं आणि सकाळी पुरेशी झोप झालेली नसताना पुन्हा कामावर जाणं, ह्यामुळे शरीरावर ताण येतोच, पण डोळ्यांवर देखील खूप ताण येतो. मग हळूहळू डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसायला लागतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मेकअपद्वारे ती […]

The post डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात first appeared on LasikVision.

]]>
#image_title

सध्याच्या कम्प्युटर युगात ऑफिसमध्ये सलग १०,१२ तास कम्प्युटरसमोर बसून काम करणं, मग घरी आल्यावर पुन्हा मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनसमोर बसणं आणि उशिरा झोपणं आणि सकाळी पुरेशी झोप झालेली नसताना पुन्हा कामावर जाणं, ह्यामुळे शरीरावर ताण येतोच, पण डोळ्यांवर देखील खूप ताण येतो. मग हळूहळू डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसायला लागतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, मेकअपद्वारे ती झाकायचा प्रयत्न करतो. पण डोळ्यांभोवती काळी वर्तुळं हा काही गंभीर आणि हल्ली सर्रास दिसणारा प्रकार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये.


मुळात डोळ्याभोवतो काळी वर्तुळं का तयार होतात आणि त्यामागची कारणं समजवून घेऊया

१) लॅपटॉप/मोबाईल स्क्रीनचा अतिवापर :- लॅपटॉप टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डार्क सर्कलसाठी कारणीभूत ठरते. स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात.

२) झोप पूर्ण न होणं :- झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण काम, डिजीटल साधनं हाताळण्यात जाणारा वेळ यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं.

३) अति मेकअपचा वापर :- अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात

४) सनस्क्रीन लोशनचा वापर न केल्यामुळे

५) गरम पाण्याने चेहरा धुण्याची सवय

६) आहारातील मीठाचं प्रमाण अति असणं

६) अति प्रमाणात धूम्रपान

७) ह्या शिवाय वय किंवा अनुवंशिकता ही देखील महत्वाची कारणं आहेत

८) पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं हे देखील ह्या समस्येचं अजून एक महत्वाचं कारण असू शकतं
ह्या समस्येवर उपाय काय ?


मुळात कम्प्युटर स्क्रीनचा अतिवापर टाळा. गरज नसेल तेंव्हा स्क्रीनपासून दूर रहा. किमान ७, ८ तासांची झोप घ्या ज्यामुळे डोळ्याच्या खालच्या नाजूक त्वचेवर ताण येणार नाही.
पण काही घरगुती उपायांनी आणि अर्थात वर सांगितलेल्या सवयी जर नीट पाळल्या तर मात्र ह्या घरगुती उपायांच्या जोरावर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी होऊ शकतात.


१) डोळ्यांवर थंड दुधाच्या किंवा पाण्याच्या घड्या ठेवा
२) दिवसातून दोनदा डोळ्यांवर काकडीचे काप ठेवणे
३) झोपताना खोबरेल तेल किंवा बदल तेल हलक्या हाताने डोळ्यांच्या त्वचेच्या खाली लावा आणिझोपून जा. दुसऱ्या दिवशी अगदी सावकाशपणे ते तेल पुसून टाका
४) डोळ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या ठेवल्याने देखील फरक पडू शकतो.

पण हे केल्याने देखील जर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं कमी होत नसतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

The post डोळ्यांभोवती काळी वर्तुळं का तयार होतात first appeared on LasikVision.

]]>
1733
कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर https://lasikvision.in/%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%2589%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%2585%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f-%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af Sat, 06 Dec 2025 08:00:04 +0000 https://lasikvision.in/?p=1728 चष्मा वापरायला आवडत नाही म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचं मुख्य कारण हे एकतर चष्मा वापरायचा कंटाळा किंवा त्रास हे असतं, किंवा चष्मा वापरायची काहीशी लाज वाटणे हे असतं. कॉन्टॅक्ट लेन्सेस हा या सगळ्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही […]

The post कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर first appeared on LasikVision.

]]>
#image_title

चष्मा वापरायला आवडत नाही म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर करण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचं मुख्य कारण हे एकतर चष्मा वापरायचा कंटाळा किंवा त्रास हे असतं, किंवा चष्मा वापरायची काहीशी लाज वाटणे हे असतं. कॉन्टॅक्ट लेन्सेस हा या सगळ्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेतली नाही तर मात्र डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

१) कॉन्टॅक्ट लेन्स वापरायची असल्यास त्या व्यक्तीचं वय कमीत कमी १८ वर्षांचं हवं, त्यापेक्षा लहान वयातल्या व्यक्तींनी कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचा हट्ट करू नये, ते त्यांच्याच डोळ्यांसाठी धोक्याचं ठरेल

२) कॉन्टॅक्ट लेन्स ही डोळ्यात सेट करताना डोळ्याशी लेन्सचा संबंध येत असल्यामुळे एकूणच हायजिन किंवा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं.

३) डोळ्यात लेन्स सरकवताना हात साबणाने स्वच्छ धुवावेत. हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतूंचा संसर्ग डोळ्यांना होण्याची शक्यता आहे

४) डोळ्यात लेन्स सरकवल्यावर ती दिवसभर डोळ्यात असते, आणि ही लेन्स ही बाह्य आणि प्लास्टिक वस्तू असल्यामुळे लेन्सची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे

५) लेन्स स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचं क्लिनिंग सोल्युशन वापरायला हवं हे विसरू नका. दरवेळी लेन्स साफ करताना नवीन क्लिनिंग सोल्युशन वापरा.

६) तुमचा लेन्सचा बॉक्स पण स्वच्छ राखणं तितकंच आवश्यक आहे. हा बॉक्स वरचेवर साबण आणि टूथब्रशने चांगला घासून स्वच्छ ठेवत जा. कारण हा बॉक्स जरासुद्धा अस्वच्छ राहिला तर डोळ्यांना थेट इन्फेक्शन होण्याचा धोका आहे

७) १२ तासांच्या वर शक्यतो डोळ्यात लेन्सेस ठेवू नका

८) सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपताना डोळ्यात लेन्सेस ठेवून झोपू नका

९) प्रत्येक लेन्स किती आठवडे/महिना वापरावी ह्याची सूचना तुमच्या लेन्सबॉक्सवर असते, त्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याचं पालन करा. थोडक्यात जर लेन्स एक महिनाच वापरावी अशी सूचना असेल तर ती तितकाच काळ वापरा

१०) लेन्स वर्षानुवर्षे वापरल्यामुळे डोळ्यांना ऍलर्जीचा संसर्ग होण्याचा धोका असतो, अशा वेळेस एकदा वापरून फेकून देता येतील अशा लेन्सेस वापरणं कधीही चांगलं

११) विविध रंगी लेन्सेसचा वापर फक्त तात्पुरता करावा आणि त्यात सुद्धा त्या लेन्सची क्वालिटी उत्तम दर्जाची असायला हवी. ह्या रंगीत लेन्सेसवर वापरलं जाणारं पिगमेंटेशन डोळ्यांना घातक ठरू शकतं.

१२) कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर त्या तज्ज्ञांकडून डोळ्यांच नीट माप घेऊन त्यांनी सुचवलेल्या मापाच्या लेन्सेसचं वापराव्यात. स्वतःच्या मतांनी कोणत्याही लेन्सेस वापरू नयेत

१३) लेन्स वापरणाऱ्यानी हाताच्या बोटांची नखं कायम व्यवस्थित कापावीत आणि ती स्वच्छ देखील ठेवावीत. कारण डोळ्यात लेन्स सरकवताना डोळ्यांना वाढलेल्या नखांमुळे इजा होऊ शकते

The post कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायच्या असतील तर first appeared on LasikVision.

]]>
1728
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल https://lasikvision.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3 Tue, 02 Dec 2025 08:44:27 +0000 https://lasikvision.in/?p=1724 पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, कारण एकतर रखरखीत उन्हापासून सुटका मिळालेली असते, त्यात पुन्हा सर्वत्र हिरवंगार झालं असल्यामुळे पिकनिकला जाण्याचा मूड बनत असतो. पण या सगळ्यात पाऊस हा अनेक आजारांना सुद्धा घेऊन येत असतो, आणि त्यांची योग्य काळजी नाही घेतली तर हे आजार त्रासदायक ठरू शकतात. पण आज आपण पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार होऊ शकतात […]

The post पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल first appeared on LasikVision.

]]>
#image_title

पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो, कारण एकतर रखरखीत उन्हापासून सुटका मिळालेली असते, त्यात पुन्हा सर्वत्र हिरवंगार झालं असल्यामुळे पिकनिकला जाण्याचा मूड बनत असतो. पण या सगळ्यात पाऊस हा अनेक आजारांना सुद्धा घेऊन येत असतो, आणि त्यांची योग्य काळजी नाही घेतली तर हे आजार त्रासदायक ठरू शकतात. पण आज आपण पावसाळ्यात डोळ्यांचे कोणते आजार होऊ शकतात आणि या ऋतूमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्यानी काय काळजी घ्यावी याबदल बोलणार आहोत.

पावसाळ्यात होणारे पाच सामान्य प्रकारचे डोळ्यांचे संसर्ग

डोळे लाल होणे (Pink Eye): या संसर्गामुळे डोळ्यांना लालसरपणा, खाज सुटणे, पाण्यासारखा स्त्राव आणि डोळे चुरचुरत असल्याचे जाणवणे. ज्यांना अशा प्रकारचा संसर्ग झाला आहे त्यांच्यामुळे इतरांना देखील संसर्ग होऊ शकतो.

जीवाणूजन्य संसर्ग (Bacterial Conjunctivitis) : जीवाणू संसर्गामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात आग होत आहे असं वाटतं.

स्टाय (Stye): तेल ग्रंथींच्या जीवाणू संसर्गामुळे पापणीवर वेदनादायक लाल फोड येतो. ते थोडे मोठे झाल्यास सूज येते.

डोळे कोरडे पडणे :- पावसाळ्यात डोळे कोरडे पडण्याचं प्रमाण अधिक असू शकतं.

यामुळे डोळ्यांची खालीलप्रमाणे काळजी घ्या
हाताची स्वच्छता : आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा, विशेषत: डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी. जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डोळे चोळणे टाळा. आणि तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर मात्र अधिकच काळजी घ्या कारण अस्वच्छ हाताने कॉन्टॅक्ट लेन्सेस हाताळल्या तर त्याचा संसर्ग अधिक होऊन डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकतं.

लेन्सेसची स्वच्छता :- पावसाळ्यात लेन्सेस बाहेरील हवेतील जंतू जाऊन बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शक्यतो लेन्सेस वारंवार काढून त्या स्वच्छ करून, पुन्हा स्वच्छ हात धुवून त्या डोळ्यात घाला.

गॉगल किंवा संरक्षणात्मक चष्मा घाला :- पावसाळ्यात डोळ्यावर गॉगल किंवा संरक्षणात्मक गॉगल का घालावा असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पण पावसाळ्यात अचानक येणाऱ्या वाऱ्यामुळे डोळ्यात धुळीचे कण उडून जाणे, डोळ्यात कुठूनतरी पाणी पडणे असे प्रकार होऊ शकतात. अशावेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यात तुम्ही जर लेन्सेस घालत असाल तर मात्र तुम्ही गॉगल किंवा संरक्षणात्मक चष्मा घालायलाच हवा.

शक्यतो लेन्सेस टाळा :- तुम्ही खूप पावसात बाहेर जात असाल किंवा कुठे पावसात पिकनिकला जात असाल तर शक्यतो लेन्सेस घालणं टाळा.

कोणाचाही टॉवेल, रुमाल, गॉगल वापरू नका :- पावसाळयात डोळ्यांचे इन्फेक्शनचे आजार वाढतात त्यामुळे शक्यतो कोणाचाही चष्मा किंवा गॉगल घालण्याचे टाळा आणि इतरांनी वापरलेला टॉवेल रुमाल अजिबात वापरू नका.

ही काळजी जर तुम्ही घेतलीत तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य छान राहील आणि तुम्ही पावसाळ्याचा आनंद घेऊ शकाल.

The post पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल first appeared on LasikVision.

]]>
1724
आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी https://lasikvision.in/%e0%a4%86%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%9c%e0%a5%80/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b3%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580 Tue, 02 Dec 2025 08:34:16 +0000 https://lasikvision.in/?p=1720 मागच्या २ लेखांमध्ये आपण वैमानिक आणि सैन्य/नौदल यांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची दृष्टी कशी असावी आणि मुख्यतः वैमानिकांना डोळ्यांच्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याबद्दल चर्चा केली. या लेखामध्ये आपण जर तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये शेफ होऊ इच्छिता त्यांना काय डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत. […]

The post आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी first appeared on LasikVision.

]]>
#image_title

मागच्या २ लेखांमध्ये आपण वैमानिक आणि सैन्य/नौदल यांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची दृष्टी कशी असावी आणि मुख्यतः वैमानिकांना डोळ्यांच्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं याबद्दल चर्चा केली. या लेखामध्ये आपण जर तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये शेफ होऊ इच्छिता त्यांना काय डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल चर्चा करणार आहोत. जसं वैमानिक किंवा सैन्य/नौदलात प्रवेश घेताना जितकी डोळ्यांची काटेकोर तपासणी केली जाते आणि फार कडक निकष लावले जातात तसे निकष जरी नसले तरी दृष्टीतल्या काही अडचणी या तुम्हाला काम करताना अडथळा निर्माण करू शकतात, त्याबद्दल आधी समजून घेऊया.


१) जर तुम्हाला चष्मा असेल तर किचनमध्ये काम करताना तिथल्या उष्णतेमुळे चष्म्यावर सारखा धूर साठणे किंवा धुरकट दिसणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अर्थात चष्मा असेल तर तुम्ही किचनमध्ये काम करूच शकत नाही असं अजिबात नाही.

२) जर तुम्ही चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर किचनमधल्या अतिउष्ण वातावरणामुळे आधीच डोळे कोरडे पडण्याची शक्यता असते, ती कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या दीर्घ वापराने अधिक होऊ शकते.

३) तुम्हाला रंगांधळेपणा असेल तर मात्र किचनमध्ये काम करणं तुम्हाला जवळपास अशक्य आहे कारण तुम्हाला पदार्थांचे विविध रंग त्यांच्या छटा समजल्याच नाहीत तर तुम्ही किचनमध्ये काम करूच शकणार नाही.

आता बघूया रेस्टोरंन्टस्च्या किचनमध्ये काम करताना डोळ्यांच्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि त्यावरचे उपाय केले पाहिजेत.

१) डोळे कोरडे पडणे :- किचमधली उष्णता आणि कोंदटपणा याने डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. त्यात पुन्हा स्टोव्ह, फ्रायर किंवा मोठ्या ओव्हनच्या सानिध्यात काम करणाऱ्यांना तर या समस्येचा सामना १००% करावा लागतो. डोळे कोरडे पडण्यावर एक उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांचा ओलावा राखणारी औषधं अगदी नियमितपणे डोळ्यात घालत राहणे. किचनमध्ये पुरेसा प्रकाश आहे ना याची चाचपणी करणे आणि नसल्यास त्याची व्यवस्था करून घेणे. दर थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेऊन डोळे मिटून बसणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी पिणे.

२) डोळ्यात फोडणी, किंवा इतर गोष्टींची वाफ जाऊन डोळ्याला इजा होणे :- किचनमध्ये शिजणारे पदार्थ असोत, तिथली भांडी ज्यांनी स्वच्छ केली जातात ती केमिकल्स असोत की तिथे निर्माण होणारा धूर असू दे याने डोळ्यांना इजा होऊ शकते. यावर एक उपाय म्हणजे डोळ्यावर शक्यतो एखादा आवरणात्मक चष्मा घालावा, आणि अर्थात किचनमधले एक्झॉस्ट पंखे नीट चालू आहेत ना हे पहावं. पण समजा तरीपण डोळ्यांना काही इजा झालीच तर डोळे थंड पाण्याने धुवावेत पण ते चोळू नयेत. आणि डोळे मिटून काही काळ शांत बसावं. आणि तरीही डोळ्यांची लाली किंवा जळजळ कमी झाली नाही तर मात्र त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे धाव घ्यावी.

३) गरम तेल किंवा एखादी वस्तू उडणे :- कधीकधी किचनमध्ये काम करताना जर तुमचा चेहरा त्या भांड्याच्या जवळ असेल तर मात्र फोडणीचे काही थेंब डोळ्यात जाऊन डोळ्यांना इजा करू शकतात. मुख्यतः गरम तेलाचे थेंब उडून डोळ्यात जाऊ शकतात. अशी घटना घडली तर मात्र कोणतेही घरगुती उपाय न करता, प्रथम डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवून तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरला दाखवावेत.

४) तुम्हाला काही पदार्थांची ऍलर्जी आहे का याची तपासणी जरूर करा. काही वेळेस एखाद्या पदार्थाची ऍलर्जी येऊन डोळे लाल होणे, त्यातून पाणी येणे हे घडू शकतं. अशी काही ऍलर्जी असल्यास मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-ऍलर्जी आयड्रॉप्स न चुकता घालावेत.

जर या सगळ्याची काळजी तुम्ही नीट घेतलीत, पोटातून माणसांची मनं जिंकणाऱ्या व्यवसायात तुम्ही दीर्घकाळ आणि यशस्वी कामगिरी करू शकाल.

The post आचारीने डोळ्यांची काळजी कशी घ्यावी first appeared on LasikVision.

]]>
1720
ब्लू लाईट चे परिणाम https://lasikvision.in/%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%82-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2582-%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%259f-%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25ae Tue, 02 Dec 2025 08:22:16 +0000 https://lasikvision.in/?p=1717 डोळा हा शरीरातील संवेदनशील अवयव आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कोव्हिडनंतर घराघरांमध्ये लॅपटॉप, टीव्हीचे एलईडी स्क्रीन्स आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटातील लोकांचं खूपच वाढलं आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांची शाळाच कम्प्युटर स्क्रीनवर भरत होती त्यामुळे तर ह्या मुलांचा स्क्रीनसमोरचा काळ हा चिंता करण्याइतका वाढला आहे. त्यात मोठ्या वयाच्या […]

The post ब्लू लाईट चे परिणाम first appeared on LasikVision.

]]>
#image_title

डोळा हा शरीरातील संवेदनशील अवयव आहे आणि त्याची योग्य ती काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. कोव्हिडनंतर घराघरांमध्ये लॅपटॉप, टीव्हीचे एलईडी स्क्रीन्स आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याचं प्रमाण सगळ्याच वयोगटातील लोकांचं खूपच वाढलं आहे. त्यातल्या त्यात लहान मुलांची शाळाच कम्प्युटर स्क्रीनवर भरत होती त्यामुळे तर ह्या मुलांचा स्क्रीनसमोरचा काळ हा चिंता करण्याइतका वाढला आहे. त्यात मोठ्या वयाच्या लोकांना सातत्याने खिशातून मोबाईल काढून काही ना काही बघत राहणं, उशिरापर्यंत ओटीटी स्क्रीन्स बघणं ह्या सवयी जडल्या आहेत. हे सगळं डोळ्यांना घातक आहे का? तर हो, ह्या सगळ्या डिव्हायसेसमधून येणारा निळ्या रंगाचा प्रकाश हा तुमच्या डोळ्यांना एका मर्यादे पलीकडे जर त्याचा वापर झाला तर घातक ठरू शकतो. कसं ते समजून घेऊया.

दिवसाला सलग अनेक तास कुठल्याही स्क्रीनच्या समोर बसण्याची सवय असल्यास मध्येच डोळ्यांना धूसर दिसणं, डोळ्यांवर ताण आल्यासारखा वाटणं, डोकेदुखीचा त्रास कधी कधी डोळ्यातून पाणी येणं तर कधी डोळे कोरडे पडल्याचा त्रास जाणवणं, अशा अनेक प्रकारांनी डोळ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाशी तुमच्या डोळ्यांचा जर खूप जास्त वेळ संबंध आला तर त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर पण होऊ शकतो. पण हे सगळं होत असताना ह्या स्क्रिन्समधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचे काही फायदे पण अभ्यासकांनी सांगितले आहेत ते म्हणजे जेंव्हा संध्याकाळी तुमचा मेंदू थकलेला असतो आणि तरीही तुम्हाला काम करावंच लागतं, अशावेळेस मेंदूचा थकवा ह्या निळ्या प्रकाशामुळे कमी होतो आणि तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची तरतरी जाणवते. जसा स्क्रिन्समधून निळा प्रकाश परावर्तित होतो तसाच तो सूर्याकडून पण होत असतो, अर्थात सूर्याकडून होणारा प्रकाश हा कम्प्युटर स्क्रीनचा प्रकाशापेक्षा खूप अधिक असतो. हा निळा प्रकाश तुमची स्मरणशक्ती वाढवायला मदत करतो.

हे काही चांगले फायदे असले तरी दीर्घकालीन तोटे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून काही सोपे नियम आणि सवयी पाळल्यास डोळ्याचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

१) स्क्रीन मग तो कम्प्युटरचा असो, मोबाईलचा किंवा घरातील एलईडी टीव्हीचा, त्याला डोळ्याच्या अगदी जवळ घेऊन बघू नका. लहान मुलं असोत की मोठी माणसं डोळ्याच्या अगदी जवळ स्क्रीन घेऊन बघण्याची त्यांना सवय असते, ही सवय टाळाच.

२) रात्री अंधारात किंवा जिथे कुठे कमी प्रकाश असेल अशा ठिकाणी स्क्रिन्सकडे बघणं शक्यतो टाळा.

३) २०-२०-२० चा फॉर्म्युला जरूर वापरा :- सलग २० मिनिटं स्क्रीनकडे बघितल्यावर  २० फुटावरील एखाद्या वस्तूकडे किमान २० सेकंद बघा किंवा किमान २० सेकंद डोळे मिटून घ्या

४) स्क्रीनचा वापर तुम्हाला टाळता येणारच नसेल तर डोळे दर दोन तासांनी थंड पाण्याने धुवून घ्या

५) डोळ्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवा जेणॆरून डोळ्यांवर आलेला ताण कमी होईल

६) आणि डोळ्याच्या डॉक्टर्सच्या सल्ल्याने स्क्रीन्ससाठी योग्य असा चष्मा निवडा.

हे सगळे नियम पाळलेत तर डोळ्याचं आरोग्य नक्की नीट राहील आणि स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश तुमचा मित्र ठरेल, शत्रू नाही. 

The post ब्लू लाईट चे परिणाम first appeared on LasikVision.

]]>
1717
बिंज वॉच https://lasikvision.in/%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9c-%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%9a/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2589%25e0%25a4%259a Tue, 02 Dec 2025 08:01:24 +0000 https://lasikvision.in/?p=1711 बिंज वॉच’ ह्या शब्दाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? नाही ? कदाचित तुम्ही ह्या शब्दाबद्दल ऐकलं नसेल पण ही शक्यता खूप मोठी आहे की तुम्ही स्वतः, ‘बिंज वॉच’ केलं असेल. बरं तुम्हाला ह्या शब्दाचा अगदी डिक्शनरी मधला अर्थ समजवून सांगण्यापेक्षा ‘बिंज वॉच’ म्हणजे नक्की काय हे सांगतो. एखाद्या ओटीटीवर, एखाद्या तुमच्या आवडत्या सिरीजचा नवीन सिझन […]

The post बिंज वॉच first appeared on LasikVision.

]]>
#image_title

बिंज वॉच’ ह्या शब्दाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? नाही ? कदाचित तुम्ही ह्या शब्दाबद्दल ऐकलं नसेल पण ही शक्यता खूप मोठी आहे की तुम्ही स्वतः, ‘बिंज वॉच’ केलं असेल. बरं तुम्हाला ह्या शब्दाचा अगदी डिक्शनरी मधला अर्थ समजवून सांगण्यापेक्षा ‘बिंज वॉच’ म्हणजे नक्की काय हे सांगतो.


एखाद्या ओटीटीवर, एखाद्या तुमच्या आवडत्या सिरीजचा नवीन सिझन आला आहे, मग दिवसभर किंवा रात्री बसून त्याचे सगळे एपिसोड्स एकदाच बघून संपवले. मग त्यासाठी कळत-नकळत तुम्ही ८, ८ तास स्क्रीनसमोर बसलेले असता.


तुम्ही एखादा गेम खेळत असता आणि त्यात इतके बिझी होऊन जाता की त्यात ३,४ तास कसे आणि कधी गेले कळलेच नाही.


एखाद्याशी फोनवर बोलताना तुम्ही हेडफोन्स लावले आहेत. तुमचं बोलणं चांगलं दोन तीन तास लांबतं पण त्या दरम्यान तुम्ही स्क्रीनवर काही ना काही चेक करत बसता.
कोणाशीतरी सहज म्हणून अनेक तास मोबाईलवर चॅट करत करत अनेक तास तुमची नजर स्क्रीनला खिळलेली आहे.


ह्यातलं एक तरी तुमच्याकडून घडलं आहे? जर उत्तर ‘हो’, असं असेल तर तुमच्याकडून नकळतपणे ‘बिंज वॉच’ झालं आहे. कदाचित तुमच्या बाबतीत हे नकळत झालं असेल, पण अनेक लोकं अगदी अभिमानाने सांगतात की आम्ही सर्रास ‘बिंज वॉच’ करतो, म्हणजे काय तर तासनतास स्क्रीनला आमची नजर खिळलेली असते.
मी एक डॉक्टर म्हणून सांगेन की ही अतिशय वाईट सवय आहे आणि तुमच्या डोळ्यांचं आरोग्य तुम्ही स्वतःच्या हाताने बिघडवत आहात.


‘बिंज वॉच’चे तुमच्या डोळ्यावर नक्की काय काय परिणाम होतात हे पहिले समजून घेऊया


१) ह्यात सातत्याने तुमची नजर अनेक तास सलग स्क्रीनवर खिळल्यामुळे तुमचे डोळे कोरडे होतात, त्यावर अतिरिक्त ताण येतो आणि ते दुखायला लागतात. ही खूण असते की तुमचे डोळे आता बसं असं सांगत असतात.
२) ‘बिंज वॉच’चा दुसरा परिणाम शरीरावर होतो तो म्हणजे तुमची झोप पुरेशी आणि योग्य वेळेला होत नाही ज्याचा थेट परिणाम डोळ्यावर होतो
३) तुमचं बिंज वॉचिंगचं प्रमाण जर खूपच वाढलं तर मात्र तुमची दृष्टी अधू होऊन तुम्हाला चष्मा लावायला लागू शकतो
ह्यावर उपाय काय असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर माझं पहिलं उत्तर आहे की खूप काळ स्क्रीनकडे बघणं टाळा. पण तरीही तुम्हाला जर त्याशिवाय पर्याय दिसत नसेलच तर मात्र खालील गोष्टी जरूर करा
१) सलग २० मिनिटाच्या वर स्क्रीनकडे बघू नका. दर वीस मिनिटांनी थांबून, २ मिनिटं डोळे शांतपणे मिटून बसून रहा.
२) स्क्रीनकडे बघताना सुद्धा पापण्यांची उघडझाप होत आहे ना हे जरूर पहा
३) समजा एखाद्या दिवशी तुमच्याकडून सलग काही तास स्क्रीनकडे बघणं झालं तर दुसऱ्या दिवशी स्क्रीनपासून पूर्ण लांब रहा
४) जेंव्हा तुम्ही बिंज वॉचिंग करत असाल तेंव्हा मध्ये मध्ये डोळे थंड पाण्याने धुवा
५) डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादं औषध डोळ्यात घाला किंवा दुसऱ्या दिवशी डोळ्यावर थंड दुधाच्या किंवा पाण्याच्या घड्या ठेवा
६) स्क्रीनकडे बघताना स्क्रीनच्या लाईटपासून बचाव करणारा चष्मा लावा
७) बिंज वॉचिंग केलंच तर दुसऱ्या दिवशी पुरेशी झोप घ्या आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राहील ह्याची काळजी घ्या

लक्षात ठेवा की बिंज वॉचिंग हे कितीही छान वाटलं तरी त्याचे डोळे, शरीराचे इतर भाग आणि मनावर होणारे परिणाम गंभीर आहेत.  

The post बिंज वॉच first appeared on LasikVision.

]]>
1711
ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य https://lasikvision.in/%e0%a4%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%258d%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2597%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259f%25e0%25a4%25bf%25e0%25a4%259d%25e0%25a4%25ae-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2583%25e0%25a4%25b7%25e0%25a5%258d Tue, 02 Dec 2025 07:44:58 +0000 https://lasikvision.in/?p=1707 ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य हा अगदी सर्रास नाही तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये आढळणारा डोळ्याचा आजार आहे. इंडियन ऑप्थलमॉलॉजी असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार भारतात १०० लोकांमागे ३० लोकांना हा त्रास आहे. जगातील अनेक देशांमध्ये देखील प्रमाण हे इतकंच आहे. फक्त हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार म्हणजे नक्की काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावरचे उपाय […]

The post ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य first appeared on LasikVision.

]]>

ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य हा अगदी सर्रास नाही तरी बऱ्यापैकी लोकांमध्ये आढळणारा डोळ्याचा आजार आहे. इंडियन ऑप्थलमॉलॉजी असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार भारतात १०० लोकांमागे ३० लोकांना हा त्रास आहे. जगातील अनेक देशांमध्ये देखील प्रमाण हे इतकंच आहे. फक्त हा आजार उपचारांनी बरा होऊ शकतो. त्यामुळे हा आजार म्हणजे नक्की काय होतं, त्याची लक्षणं कोणती आणि त्यावरचे उपाय समजून घेऊया.
डोळ्याच्या बाहुलीचा पडद्याचा आकार जो अर्धगोलाकार असतो तो तसा नसून अंडाकृती होतो तेंव्हा जवळच किंवा लांबचं सुद्धा धूसर दिसू लागतं, याला ऍस्टिग्माटिझम म्हणतात.

या आजाराची लक्षणे
१) धूसर दिसणे
२) डोळ्यांवर सारखा ताण येणे
३) सारखं डोकं दुखणे
४) रात्री कमी दिसणे
५) तिरळेपणा

यापैकी कोणतीही लक्षणे आढळली तर ऍस्टिग्माटिझम असण्याची शक्यता असू शकते. अर्थात ही सगळी लक्षणे ही डोळ्याच्या इतर आजारांची पण कारणं असू शकतात, त्यापैकी ऍस्टिग्माटिझम असू शकतो. त्यामुळे वरीलपैकी कोणतंही लक्षण आढळलं तर डोळ्यांच्या डॉक्टरांना जरूर भेट द्या. मुख्यतः लहान मुलांच्या बाबतीत या आजराची कोणतीही लक्षणं असली तरी त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे त्यांचे डोळे जन्मानंतर ६ महिन्यांनी डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेऊन दाखवून घ्याच.

उपाय
१) डोळ्याच्या बुबुळाच्या पडद्याच्या आकाराला साजेशा लेन्सेस आता उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे लेन्सेसचा चष्मा वापरून या आजारातील त्रासापासून सुटका करून घेता येऊ शकते.

२) सध्या या आजाराच्या त्रासापासून सुटका देणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्सेस देखील उपलब्ध आहेत. पण या कॉन्टॅक्ट लेन्सेस जर दीर्घकाळ वापरल्या तर डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकते, म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेस हा उपाय जरी असला तरी त्याचा वापर कमीत कमी करा.

३) या पडद्याचा आकार अचूक आणण्यासाठी काही शस्त्रक्रिया देखील आता करता येणे शक्य आहे. अर्थात प्रत्येक डोळ्याची अशी शस्त्रक्रिया करणं शक्य असेलच असं नाही, त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरच्या सल्ल्यानेच अशी शस्त्रक्रिया करावी.

थोडक्यात हा आजार जरी गंभीर नसला आणि यावर उपाय करणे सहज शक्य असलं तरी डॉक्टरकडे योग्य वेळेत जाणे हाच या आजराच्या त्रासापासून मुक्त होण्याचा सगळ्यात सोपा उपाय. 

The post ऍस्टिग्माटिझम किंवा दृष्टिवैषम्य first appeared on LasikVision.

]]>
1707
आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी https://lasikvision.in/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a5%8d/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b3%25e0%25a5%258d Tue, 02 Dec 2025 07:13:31 +0000 https://lasikvision.in/?p=1698 मागच्या लेखात आपण. वैमानिक होण्यासाठी तुमच्या दृष्टीची क्षमता कशी असावी लागते आणि त्यासाठीचे काय निकष पाळले जातात याबद्दल बोललो. या लेखात आपण सैन्यदलात आणि नौदलात जाण्यासाठी काय निकष तपासले जातात हे पाहूया. सर्वप्रथम सैन्यदलात जाण्यासाठी काय दृष्टीचे काय निकष बघितले जातात. १) सैन्यदलात भरती होणाऱ्यांची दूरची नजर किंवा दूरच दिसण्याची क्षमता ही उत्तम असावी लागते. […]

The post आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी first appeared on LasikVision.

]]>
#image_title

मागच्या लेखात आपण. वैमानिक होण्यासाठी तुमच्या दृष्टीची क्षमता कशी असावी लागते आणि त्यासाठीचे काय निकष पाळले जातात याबद्दल बोललो. या लेखात आपण सैन्यदलात आणि नौदलात जाण्यासाठी काय निकष तपासले जातात हे पाहूया. सर्वप्रथम सैन्यदलात जाण्यासाठी काय दृष्टीचे काय निकष बघितले जातात.


१) सैन्यदलात भरती होणाऱ्यांची दूरची नजर किंवा दूरच दिसण्याची क्षमता ही उत्तम असावी लागते. यासाठी २०/२० हा निकष लावला जातो म्हणजे साधारणपणे २० फुटापर्यंतच जर तुम्ही स्वच्छ बघू शकत असाल तर तुम्ही पायलट होण्यासाठी योग्य आहात असं मानलं जातं. यासाठी तुमची निवड होण्याच्या आधीच तुमच्या डोळ्यांची तपासणी केली जाते. जसं डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चार्टकडे बघून त्यावरची अक्षरं वाचता तशाच पद्धतीच्या चाचण्या घेतल्या जातात

२) उमेदवाराच्या जवळच्या चष्म्याचा नंबर हा २.५ पेक्षा जास्त असू नये.

३) सगळे रंग डोळ्यांना नीट बघता यायला हवेत.

४) उमेदवार किंवा त्याच्या घरात कोणाला रातांधळेपणा नाही याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं.

५) लॅसिक किंवा तत्सम कुठलंही ऑपरेशन झालेलं नाही हे देखील तपासलं जातं.



आता नौदलात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला दृष्टीचे काय निकष लावले जातात ते बघूया


१) भारतीय सैन्यात जे निकष लावले जातात तेच इथे देखील लावले जातात ते म्हणजे २० फुटापर्यंतच्या गोष्टी उमेदवाराला स्वच्छ दिसल्या पाहिजेत, वाचता आल्या पाहिजेत

२) उमेदवाराचा जवळचा चष्म्याचा नंबर ०.७५ पेक्षा जास्तीचा असता कामा नये दीड पेक्षा जास्त लांबचा नंबर असू नये

३) ग्रेड ३ ची बायनॉक्युलर व्हिजन असायला हवी आणि रंगांधळेपणा बिलकुल नसावा.

मुळात ज्यांना सैन्यात किंवा नौदलात जायची इच्छा आहे त्या तरुण-तरुणींनी डोळ्यांची काळजी अगदी लहानपणापासून घ्यायला हवी. खूप दीर्घकाळ टीव्ही पाहणे किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन पाहणे टाळायला हवं कारण याने डोळ्यांवर ताण येऊन तुम्हाला चष्मा लागू शकतो.  २०-२०-२० चा नियम पाळणे. दर वीस मिनीटांनी २० सेकंदांसाठी २० फुटांवरची एखादी वस्तू बघायचा प्रयत्न करा किंवा अगदी ते शक्य नसेल तर २० सेकंद डोळे मिटून घ्या जेणेकरून डोळ्यावर अनावश्यक ताण येणार नाही.  डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांना कोरडेपणा येऊ नये म्हणून एखादं ल्युब्रिकंट औषध जरूर घालत रहा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नेहमी पुरेशी म्हणजे रात्रीची ७, ८ तासांची झोप घ्या आणि कायम पोषक आणि चौरस आहार घ्या, ज्यात मुख्यतः भाज्या फळे, अंडी यांचा समावेश करा.

हे सगळं केलं तर तुमच्या सैन्य किंवा नौदलात जाण्याच्या स्वप्नात तुमची दृष्टी कधीच अडथळा ठरणार नाही.

The post आर्मी व नेव्ही करिता डोळ्यांची स्तिथी first appeared on LasikVision.

]]>
1698